शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

Kamthi Election Results : बावनकुळेंच्या पुण्याईने सावरकर यांना तारले : काँग्रेसने भरविली होती धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 00:20 IST

Kamthi Election Results 2019 : Tekchand Sawarkar Vs Suresh Bhoyar , Maharashtra Assembly Election 2019

ठळक मुद्देभोयर यांना शहरात फटका

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर (कामठी) : राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विकास कामांच्या पुण्याईने भाजपचे टेकचंद सावरकर यांना कामठीत शेवटच्या क्षणी तारले. जिल्ह्यात भाजपची पीछेहाट झाली असता मतदानाच्या अखेरच्या दिवशी बावनकुळे यांनी माझ्यासाठी सावरकर यांना विजयी करा, अशी मतदारांना हाक दिली. मात्र मतमोजणीच्या सुरुवातीच्या काही फेरीत काँग्रेसचे सुरेश भोयर यांनी भाजपला धक्का दिला. त्यामुळे सावरकरही हरतील असे वाटत होते. मात्र मतदार संघातील शहरी मतदारांनी भाजपला साथ दिल्याने सावरकर ११ हजार ११६ मतांनी विजयी झाले. सावरकर यांना तब्बल १,१८,१८२ तर भोयर यांना १,०७,०६६ मते मिळाली. कामठीत ऑल इंडिया मजलिस-ए-इतेहादुल मुसलमिनचे (एमआयएम) शकीबूर रहमान अतिकूर रहमान यांनी घेतलेली ८,३४५ मते भोयर यांच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. वंचित बहुजन आघाडीचे राजेश काकडे यांनी १०,६०१ मते घेत काँग्रेसच्या मतांना खिंडार पाडले. बसपाचे प्रफुल मानके यांना ७,६१२ मते मिळाली, तर प्रहारचे मंगेश देशमुख ११३८ मतावर थांबले.मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सावरकर यांनी ४१० मतांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीत सावरकर यांनी ४,५२६ मते घेत काँग्रेसचे भोयर यांना ९६३ मतांनी मागे टाकले. यानंतर कामठी शहरातील बूथच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसचे सुरेश भोयर यांनी ४,३४८ मते घेत सावरकर यांना ७९० मतांनी मागे टाकले. कामठी शहरात (एमआयएम) आणि वंचित बहुजन आघाडीने मुसंडी मारल्याने भोयर यांना येथे अपेक्षेप्रमाणे मते मिळाली नाही. यानंतरच्या फेरीत भोयर आणि सावरकर यांच्यात काट्याची टक्कर झाली. मात्र शेवटच्या काही फेरीत भोयर यांना कमी मते मिळाल्याने पराभवाला सामोरे जावे लागले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kamthi-acकामठीBJPभाजपा