शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कांबळे दुहेरी खून खटला नागपुरातच चालणार : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 00:25 IST

कांबळे दुहेरी खून खटला नागपूर सत्र न्यायालयातच चालेल यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. हा खटला दुसऱ्या राज्यात स्थानांतरित करण्यासाठी आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली. न्यायमूर्तीद्वय एस. अब्दुल नझीर व आर. सुभाष रेड्डी यांनी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे आरोपींना जोरदार दणका बसला आहे.

ठळक मुद्दे खटला स्थानांतरणाची याचिका फेटाळली

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कांबळे दुहेरी खून खटला नागपूर सत्र न्यायालयातच चालेल यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. हा खटला दुसऱ्या राज्यात स्थानांतरित करण्यासाठी आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली. न्यायमूर्तीद्वय एस. अब्दुल नझीर व आर. सुभाष रेड्डी यांनी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे आरोपींना जोरदार दणका बसला आहे.प्रकरणातील आरोपींमध्ये गणेश शिवभरण शाहू, गुडिया ऊर्फ गुड्डी गणेश शाहू, अंकित शिवभरण शाहू व एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. हा खटला चालवित असलेले अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. काझी हे राजकीय दबावात कार्य करीत असल्याचे आरोपींचे म्हणणे होते. सरकारने हा आरोप फेटाळून लावला. न्या. काझी यांच्यावर कोणताही दबाव नाही. आरोपींना स्वत:च्या संरक्षणासाठी भरपूर वेळ देण्यात आला आहे. सत्र न्यायालयाने आरोपींविरुद्ध दोषारोप निश्चित केले असून एक साक्षीदारही तपासण्यात आला आहे असे सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता आरोपींची याचिका खारीज केली.आरोपींवर उषा कांबळे व त्यांची चिमुकली नात राशी यांचा खून केल्याचा आरोप आहे. ही घटना १७ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली होती. घटनेच्या दिवशी आरोपी व उषा कांबळे यांच्यामध्ये भिसीच्या पैशांवरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी उषा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दीड वर्षीय राशीचाही निर्घृण खून केला. त्यानंतर दोघांचेही मृतदेह नाल्यात फेकून दिले. आरोपी पवनपुत्रनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी आहेत. सर्वोच्च न्यायालयात आरोपींतर्फे अ‍ॅड. गगन सांगी व अ‍ॅड. सिद्धार्थ धर्माधिकारी, सरकारतर्फे अ‍ॅड. निशांत काटनेश्वरकर तर, फिर्यादी रविकांत कांबळे यांच्यातर्फे अ‍ॅड. सचिन पुजारी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMurderखून