शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

कालिदासाच्या शब्दसामर्थ्याचा ‘आषाढातील एक दिवस’

By admin | Updated: June 13, 2014 01:31 IST

संस्कृतचे श्रेष्ठ महाकवी कालिदास यांची प्रत्येक नाट्यकृती म्हणजे एक महाकाव्यच आहे. त्यांच्या अजरामर मेघदूतमवर आधारित मोहन राकेश लिखित हिंदीतील ‘आषाढ का एक दिन’ या नाटकाचा

अनुभूती सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ : नाट्यप्रयोगाचे सादरीकरण नागपूर : संस्कृतचे श्रेष्ठ महाकवी कालिदास यांची प्रत्येक नाट्यकृती म्हणजे एक महाकाव्यच आहे. त्यांच्या अजरामर मेघदूतमवर आधारित मोहन राकेश लिखित हिंदीतील ‘आषाढ का एक दिन’ या नाटकाचा मराठीत ज्योती सुभाष यांनी अनुवाद केला आहे. या ‘आषाढातील एक दिवस’ या तीन अंकी नाटकाचा प्रयोग आज अनुभूती सांस्कृतिक महोत्सवात सादर करण्यात आला. हा कार्यक्रम डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाईन्स येथे पार पडला. या नाटकानेच अनुभूतीच्या सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला. नाटकघर आणि श्री सिद्धी विनायक, पुणे निर्मित नाटकाचे दिग्दर्शन अतुल पेठे यांनी केले होते. डॉ. हर्षवर्धन मार्डिकर संकल्पित या महोत्सवाला विख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मोहन राकेश लिखित हिंदी नाटकाला १९५९ साली नाटक अकादमीचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार लाभला आहे. मराठीसह जपानी भाषेतही त्याचा अनुवाद करण्यात आला आहे. या नाटकावर आधारीत मणी कौल दिग्दर्शित सिनेमालाही फिल्मफेअरने गौरविण्यात आले आहे. कवी कालिदास आणि त्याची प्रेयसी मल्लिका यांच्या निखळ-निरागस प्रेमकथेवरील नाटक सहज भाषाशैली, ओघवते संवाद, परस्परांच्या कोमल भावनांचे हळुवार चित्रण, विरोधी पात्रांचे कुशल संयोजनासह मराठीतही एक अमिट नाट्यकृती झाली आहे. संवेदनशील मनाचा आणि उत्तुंग प्रतिभेचा कवी कालिदास निसर्गसौंदर्याने नटलेल्या लहान गावातील तरुण. मल्लिका देखणी, निरागस आणि भावनाप्रधान तरुणी. मल्लिका हीच कालिदासाची स्फूर्तीदेवता असते. आषाढातील एका पावसाळी सायंकाळी बेधुंद पावसात दोघेही भिजतात तेवढेच परस्परांच्या रोमांचक सहवासातही भिजतात. मल्लिकाची आई अंबिकाचा या प्रेमाला विरोध असतो. कारण तिच्या व्यवहारी दृष्टिकोनात निर्धन कालिदासाची किंमत नसते. त्यातच कालिदासाला उज्जयनीच्या राजदरबारात राजकवी होण्याची संधी मिळते. कालिदास मल्लिकापासून दूर जायला तयार नसतो. मल्लिका त्याला राजदरबारात जाण्याचा आग्रह धरते. त्यानंतर मात्र हा विरह कधीच संपत नाही. कालिदास ऐश्वर्यसंपन्न आणि कीर्तीमान होतो. गुप्त साम्राज्याच्या राजकुमारीसह त्याचा विवाह होतो. मल्लिका त्याच्या प्रतीक्षेत खंगते. कालिदास तिला भेटायला येतो तेव्हा मल्लिका परिस्थितीशरण गणिका आणि एका बाळाची आई होते. कालिदास निराश मनाने माघारी फिरतो, ती वेळही आषाढातील सांजवेळच. कालिदास मल्लिकाच्या भूमिकेत आलोक राजवाडे व पर्ण पेठे तर अंबिकेच्या भूमिकेत ज्योती सुभाष यांनी जीव ओतला. डॉ. दीपक मांडे, आलोक राजवाडे, ओम भूतकर, ऋचा आपटे, रणजित मोहिते, तुषार गुंजाळ, कृतार्थ शेवगावकर या कलावंतांनी अभिनयाने हे नाटक पेलून धरले. तुषार पंडित यांचे संगीत संयोजन तर दत्तात्रय शिंदे यांचे अचूक नेपथ्य यांचाही उल्लेख करावासा वाटतो. अंजली भांडारकर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी सर्व कलावंतांचा सत्कार मध्यंतरात करण्यात आला. (प्रतिनिधी)