शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

नागपुरात कालिदास महोत्सव ५ जानेवारीपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 23:52 IST

नागपूरच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरलेला कालिदास समारोह यंदा ५ ते ७ जानेवारी २०२० या कालावधीत कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीम बाग येथे आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहेश काळे यांच्या शास्त्रीय गायनाने सुरूवात : स्थानिक कलावंतांनाही संधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरलेला कालिदास समारोह यंदा ५ ते ७ जानेवारी २०२० या कालावधीत कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीम बाग येथे आयोजित करण्यात आला आहे. कवि कुलगुरु कालिदास लिखित ‘विक्रमोर्वशीयं’ या काव्य ग्रंथावर आधारित यावेळचा समारोह राहणार आहे.कवि कालिदास समारोहाचे उद्घाटन ५ जानेवारी २०२० या रोजी सायंकाळी ६ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तसेच ७ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ६ वाजता केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.५ रोजी स्थानिक कलाकार सुकीर्ती उईके यांचे शास्त्रीय गायन तसेच अरुपा लाहिरी यांचे भरत नाट्यम व सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांचे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ६ जानेवारी रोजी समन्वय सरकार यांचे सीतारवादन, शर्वरी जननी यांचे कथ्थक नृत्य व सप्तक नागपूर प्रस्तृत पंचतत्व हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच ७ जानेवारी २०२० रोजी सुश्री स्वरुप यांचे ओडिसी नृत्य व नुरान सिस्टर्स यांचे सुफी गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलावंत कालिदास महोत्सवात आपली हजेरी लावून आपला कलाविष्कार सादर करणार आहे. कालिदास महोत्सव नागपूर व रामटेकपर्यंत न राहता महाराष्ट्राची ओळख व्हावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन भव्य स्वरुपात करण्यात येत आहे. कालिदास सांस्कृतिक कार्यक्रम पूर्णत: नि:शुल्क आहे.

टॅग्स :Kalidas Festivalकालिदास महोत्सवnagpurनागपूर