शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
2
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
3
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
5
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
6
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
7
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
8
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
9
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
10
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
11
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
12
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
13
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
14
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
15
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
16
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
17
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
18
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
19
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
20
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता

कालिदास महोत्सव : आरोग्यज्ञान, श्रवणभानाने अन् पदन्यासाच्या सुरेखतेने गाजली संध्याकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 23:33 IST

रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात सुरू असलेल्या कालिदास महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आरोग्य जागृतीचे ज्ञान, सतारीच्या मधूर कंपनाचे श्रवणज्ञान आणि लयपूर्ण पदन्यासाची नृत्यजाणिव रसिकांना करता आली.

ठळक मुद्देशर्वरी जमेनिस यांनी नृत्यातून सादर केले ‘अर्धनारिनटेश्वरस्तोत्र’पंचतत्त्वातून वैद्यांनी सांगितली शरीरसृष्टीचे विज्ञानसमन्वय सरकार यांची सतार अन् पिनाकी चक्रवर्ती यांच्या तबलावादनाची चालली जादू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कालिदास समारोह आयोजन समिती, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात सुरू असलेल्या कालिदास महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आरोग्य जागृतीचे ज्ञान, सतारीच्या मधूर कंपनाचे श्रवणज्ञान आणि लयपूर्ण पदन्यासाची नृत्यजाणिव रसिकांना करता आली.

सोमवारी सप्तकतर्फे ‘पंचतत्त्व’ या आयुर्वेद ज्ञान, नृत्य अन् संगीताच्या मेजवानीने महोत्सवाची सुरुवात झाली. रेणुका देशकर यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या या कार्यक्रमाचे संगीत नियोजन शैलेश दाणी, २५ नृत्यांगनांच्या चमूचे नृत्य दिग्दर्शन स्वाती भालेराव यांचे होते तर गीत प्रणव पटवारी यांचे होते. संगीत आणि नृत्य दिग्दर्शन विशेषत: याच कार्यक्रमासाठी तयार करण्यात आले होते. वायू, आप, तेज, आकाश आणि पृथ्वी या पाच तत्त्वांचा सखोल अभ्यास करून अनेक सवयी आपल्या दैनंदिन जीवनात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. या पंचतत्त्वांचे संतुलन, मग ते निसर्गातील असो किंवा मानवी शरीरातील, बिघडल्यास विनाशकारी परिणाम होतात. आज पर्यावरण असंतुलन आणि त्याचे परिणाम हाच धोक्याचा इशारा देत असून, सावध होण्याची हीच खरी वेळ असल्याचा तज्ज्ञांचा सूर या कार्यक्रमात उमटला. या चर्चेत वैद्य मृणाल जामदार, डॉ. संदीप शिरखेडकर व डॉ. योगेश मुरकुटे यांनी सहभाग घेतला आणि त्यांना रेणुका देशकर यांनी बोलते केले. वेदातील ऋचांचा समावेश आणि खास या कार्यक्रमासाठी रचलेले पंचतत्त्व गीत हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. त्यानंतर बंगालचे सुप्रसिद्ध सितारवादक समन्वय सरकार यांच्या सतारवादनाचा कार्यक्रम श्रवणीय ठरला. सतारीची छेडली जाणारी एक एक तार, त्यातून उमटणारे मधूर स्वर आणि त्यातून प्राप्त होणारा चैतन्य अनुपम ठरला. त्यांना तबल्यावर पिनाकी चक्रवर्ती यांनी धमाकेदार संगत केली. 
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात दोघांच्याही जुगलबंदीने रसिक तृप्त झाले. अखेरच्या सत्रात प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना शर्वरी जमेनिस यांनी आद्य शंकरराचार्य रचित ‘अर्धनारिनटेश्वरस्तोत्र’ नृत्याभिनयातून सादर केला. शरीराची डावी बाजू म्हणजे शक्ती आणि उजवी बाजू म्हणजे शिव. भाव आणि सौंदर्याचा अनुपम जोड सृष्टीशी करणाºया स्तोत्राला सुरेल पदन्यास, नयनकटाक्ष आणि हस्तमुद्रिकेतून त्यांनी सादर केला. त्यांना तबल्यावर त्यांचे पती निखिल फाटक, संवादिनीवर चिन्मय कोल्हटकर, बासरीवर सुनील अवचट यांनी संगत केली. तर पढंत जुई सगदेव यांनी केली. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन श्वेता शेलगावकर व रेणुका देशकर यांनी केले.साऊंड सिस्टीम झाली ब्रेकशर्वरी जमेनिस यांचे नृत्यसादरीकरण होत असताना दरम्यान सभागृहातील ध्वनिव्यवस्था काही काळ खोळंबली होती. त्यामुळे, कार्यक्रमाची लय तुटल्याने प्रेक्षकांसह स्वत: शर्वरी नाराज दिसल्या. नृत्याचा तो बाज टिकवण्यास त्यांना नंतर त्रास झाल्याचे दिसून येत होते.नागपूरकर रसिक उजवे - शर्वरी जमेनिसमी अनेक ठिकाणी नृत्यसादरीकरण करते. पुण्याचे रसिक जास्तच चोखंदळ असतात, असे म्हटले जाते. मात्र, मी नागपुरात जेव्हा जेव्हा आली तेव्हा तेव्हा नागपूरकर रसिक जास्त उजवे वाटल्याची दाद शर्वरी जमेनिस यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Kalidas Festivalकालिदास महोत्सवnagpurनागपूर