शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

कल्लू यादव गोळीबार; मास्टरमाईंडला अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, शहर पोलिसांच्या ताब्यात दिले

By नरेश रहिले | Updated: March 4, 2025 20:02 IST

Gondia News: गोंदिया येथील माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू सुंदरलाल यादव (४२, रा. यादव चौक, गोंदिया) यांच्यावर ११ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या गोळीबार प्रकरणातील मास्टरमाईड प्रशांत मेश्राम याला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे.

- नरेश रहिलेगोंदिया  - येथील माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू सुंदरलाल यादव (४२, रा. यादव चौक, गोंदिया) यांच्यावर ११ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या गोळीबार प्रकरणातील मास्टरमाईड प्रशांत मेश्राम याला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि.३) रात्री ८ वाजता त्याच्या घरावर धाड घालून ताब्यात घेतले.

माजी नगरसेवक व जय श्री महाकाल सेवा संस्थानचे अध्यक्ष कल्लू यादव ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सावलानी किराना दुकानाच्या समोरून जात असताना हेमू कॉलनी चौक येथे दिवसाढवळ्या पाच फूट अंतरावरून दोन दुचाकीस्वार नेमबाजांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या जीवघेण्या हल्ल्यात एक गोळी कल्लू यादव यांच्या शरीरात शिरली होती. डॉक्टरांनी ती गोळी काढून कल्लू यादव यांचे प्राण वाचविले होते. याप्रकरणी पोलिसांनी दान शूटर्सना अटक करून माऊसर पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, दोन दुचाकी, हल्ल्यात वापरलेले चार मोबाईल जप्त करून त्यानंतर एकूण नऊ आरोपींना अटक केली होती. या प्रकरणाचा मास्टरमाईंड प्रशांत मेश्राम हा तेव्हापासूनच म्हणजेच मागील १४ महिन्यांपासून फरार होता. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून तो सतत आपली ठिकाणे बदलत होता. अशातच गुप्तहेराकडून ठोस माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी सोमवारी (दि.३) सायंकाळी भीमनगर परिसरात सापळा रचून मेश्रामच्या घराची झडती घेत त्याला पकडले. मुख्यसुत्रधार दहावा आरोपीया प्रकरणात १२ जानेवारी २०२४ रोजी आरोपी गणेश शिवकुमार शर्मा (२१, रा. भिडी ले आउट, वरोडा, ता. कळमेश्वर, जि. नागपूर), अक्षय मधुकर मानकर (२८, रा. सम्राट ग्राउंड शिक्षक कॉलोनी, कळमेश्वर जि. नागपूर), धनराज ऊर्फ रिंकू व राजेंद्र राऊत (३२, रा. कुंभारेनगर, गोंदिया), नागसेन बोधी मंतो (४१, रा. गौतम बुध्द वाॅर्ड, श्रीनगर, गोंदिया) यांना तर १३ जानेवारी रोजी शुभम विजय हुमणे (२७, रा. भिमनगर, गोंदिया), सुमित ऊर्फ पंछी विकास डोंगरे (२३, रा. कुंभारेनगर, गोंदिया) यांना, १४ जानेवारी रोजी रोहीत प्रेमलाल मेश्राम (३२, रा. कुंभारेनगर, गोंदिया), १५ जानेवारी रोजी नितेश ऊर्फ मोनू लखनलाल कोडापे (२८, रा. विहीरगाव, तिरोडा, ह.मु. कुंभारेनगर, गोंदिया) व मयुर ऊर्फ सानू विजय रंगारी (२७, रा. सिंगलटोली, आंबेडकर वाॅर्ड, गोंदिया) यांना अटक केली होती. आता ३ मार्च २०२५ रोजी प्रशांत मेश्राम या दहाव्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

४० लाखांत घेतली होती सुपारीशिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर ११ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गोळीबार करणाऱ्या आरोपींना ४० लाखात सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणात आरोपींना फक्त पाच हजार रूपये देण्यात आले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी