शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

कडकनाथचा झटका; शेतकऱ्यांना दीड कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 12:19 IST

कडकनाथ कोंबडी पालनाच्या व्यवसायातून अल्पावधीत लाखोंचा फायदा मिळतो, अशी थाप मारून आपल्या कंपनीत रक्कम गुंतविण्यास भाग पडणाऱ्या सांगली जिल्ह्यातील दोन ठगबाजांनी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ कोटी, ६० लाख रुपयांचा गंडा घातला.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातील ठगबाजांचे कटकारस्थान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कडकनाथ कोंबडी पालनाच्या व्यवसायातून अल्पावधीत लाखोंचा फायदा मिळतो, अशी थाप मारून आपल्या कंपनीत रक्कम गुंतविण्यास भाग पडणाऱ्या सांगली जिल्ह्यातील दोन ठगबाजांनी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ कोटी, ६० लाख रुपयांचा गंडा घातला.गेल्या अनेक दिवसापासून आरोपींकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पीडित शेतकऱ्यांना फसविण्यात आल्याचे लक्षात आले. त्यामुळे बजाजनगर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार नोंदविली. सुधीर शंकर मोहिते (वय ३०, रा. वडेगाव, कडेगाव, जी. सांगली) आणि संदीप सुभाष मोहिते (वय ३०, रा. इस्लामपूर, जि. सांगली) अशी आरोपींची नावे आहेत. वर्षभरापूर्वी आरोपी नागपुरात आले होते त्यांनी महा रयत अ‍ॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तसेच रयत अ‍ॅग्रो इंडिया लिमिटेड या दोन कंपनी आपल्या मालकीच्या असून कंपनीमार्फत शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन आणि आर्थिक फायद्याच्या वेगवेगळ्या योजना समजावून सांगितल्या होत्या. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर या दोन ठगबाजानी आपल्या कंपनीतील अधिकाऱ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायाचे स्वरूप समजावून सांगितले. यातून अल्पावधीत मोठा आर्थिक फायदा मिळतो, असे सांगून त्यांनी वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून वेगवेगळी रक्कम जमा केली. मूळचे न्यू कॉलनी, फेज नंबर दोन, नवी दिल्ली येथील रहिवासी असलेले आणि सध्या कळमेश्वर तालुक्यातील सेलू गुमथळा गावात राहणारे विकास बळवंत मेश्राम यांनाही हेच आमिष दाखवले होते. त्यामुळे मेश्राम आणि अन्य ११० शेतकऱ्यांनी आरोपींकडे ३ एप्रिल २०१९ पासून १ सप्टेंबर २०१९ पर्यंत वेगवेगळी रक्कम दिली. मेश्रामसह १११ शेतकऱ्यांकडून एकूण १ कोटी, ६० लाख, ५६० रुपये गोळा करून आरोपींनी गाशा गुंडाळला. त्यांनी केलेल्या करारानुसार कोणत्याही प्रकारचा लाभ पैसे गुंतविणाऱ्या शेतकऱ्यांना मिळाला नाही. कराराचे पालनही झाले नाही. अलीकडे सुधीर मोहिते आणि संदीप मोहिते पैसे देणे दूर, शेतकऱ्यांना प्रतिसादच देत नव्हते. त्यामुळे त्यांनी फसवणूक केल्याचे सर्वांच्या लक्षात आले. त्यामुळे सर्वांच्यावतीने मेश्राम यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात काही दिवसापूर्वी तक्रार अर्ज दिला. त्याची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर सुधीर मोहिते आणि संदीप मोहिते या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपींची अनेक ठिकाणी ठगबाजीआरोपींनी अशा प्रकारे अनेक ठिकाणी ठगबाजी करून शेतकऱ्यांना गंडविले असावे, असा पोलिसांचा संशय आहे. शुक्रवारी बजाजनगर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरी