शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

'कबीरा खडा बाजार में सबकी मांगे खैर'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 22:13 IST

तब्बल ३८ पात्रांचा अभिनय..४३ रागातील दोहे..अवधी भाषेचा मधाळ गोडवा..काशीला स्पर्श करीत वाहणाऱ्या  गंगेच्या काठावर दिवसागणिक वाढणारा कबीर आणि त्याच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होणारे जीवनाचे तत्त्वज्ञान..अशा अडीच तासांच्या वेगवान संगीत नाटकाद्वारे शेखर सेन यांनी नागपूरकरांना संत कबीर या नावाचा अन्वयार्थ साभिनय सांगितला.

ठळक मुद्देशेखर सेनचे सादरीकरण : खासदार महोत्सवात साकारला कबीराचा जीवनप्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तब्बल ३८ पात्रांचा अभिनय..४३ रागातील दोहे..अवधी भाषेचा मधाळ गोडवा..काशीला स्पर्श करीत वाहणाऱ्या  गंगेच्या काठावर दिवसागणिक वाढणारा कबीर आणि त्याच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होणारे जीवनाचे तत्त्वज्ञान..अशा अडीच तासांच्या वेगवान संगीत नाटकाद्वारे शेखर सेन यांनी नागपूरकरांना संत कबीर या नावाचा अन्वयार्थ साभिनय सांगितला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार महोत्सवात शनिवारी ‘संत कबीर’ या एकपात्री संगीत नाटकाच्या ४१२ व्या प्रयोगाने प्रेक्षकांना अंतर्मुख केले. भव्य रंगमंचावर अगदी शून्य नेपथ्य असतानाही शेखर सेन यांनी केवळ त्यांच्या जिवंत अभिनयाने एकहाती या नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेले. कुठूनतरी लांबून नदीत वाहत येणारा एक बालक निरू नावाच्या नावाड्याला सापडतो आणि तो त्याला घरी घेऊन येतो. निरूची पत्नी निमा त्याला पोटच्या बाळाप्रमाणे सांभाळते. परंतु तो या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आला नसल्याने त्याला समाजात पदोपदी अपमान सहन करावा लागतो. हा अपमानच त्याला निर्विकार विधात्याच्या शोधासाठी प्रोत्साहित करतो आणि पुढे हा शोध कबीराला ‘संत कबीर’ बनवून टाकतो. शेखर सेन यांच्या सिद्धहस्त लेखणीतून जन्मलेल्या या नाटकाला त्यांच्या गोेड आवाजातील दोह्यांनी अधिक रंजक केले. ‘पाथर पुजे हरी मिले... तो मै पूजू पहाड रे...’ असेल किंवा ‘कबीरा खडा बाजार में सबकी मांगे दुआ, न काहू से दोस्ती न काहू से बैर...’ यासरख्या कबीराच्या गाजलेल्या दोह्यांनी या नाटकात रंगत भरली. ‘औरत जात का रोना और कुंभकर्ण का सोना अगर एक बार शुरू हो जाए तो बस रुकने का नाम हीं नहीं लेते...’ यासारख्या विनोदी संवादांनीही श्रोत्यांच्या खूप टाळ्या मिळवल्या.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर