शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आरपीएफची प्रतिमा उंचावण्यात यशस्वी झालो : ज्योती कुमार सतीजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:15 IST

मागील चार वर्षात नागपूर शहरात रेल्वे सुरक्षा दलाचा वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त म्हणून काम करताना अनेक चांगले अनुभव आले. नागपुरातील नागरिक प्रेमळ आहेत. आरपीएफचा प्रमुख म्हणून अनेक चांगली कामे केली. अनेक उपक्रम राबवून आरपीएफची प्रतिमा उंचावण्यात यशस्वी झालो, असे प्रतिपादन ज्योती कुमार सतीजा यांनी केले.

ठळक मुद्देउप महानिरीक्षकपदी लखनौला बदली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील चार वर्षात नागपूर शहरात रेल्वे सुरक्षा दलाचा वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त म्हणून काम करताना अनेक चांगले अनुभव आले. नागपुरातील नागरिक प्रेमळ आहेत. आरपीएफचा प्रमुख म्हणून अनेक चांगली कामे केली. अनेक उपक्रम राबवून आरपीएफची प्रतिमा उंचावण्यात यशस्वी झालो, असे प्रतिपादन ज्योती कुमार सतीजा यांनी केले.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांची पदोन्नतीवर लखनौच्या आरपीएफ ट्रेनिंग अ‍ॅकेडमीच्या उपमहानिरीक्षक पदावर बदली झाली. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. सतीजा म्हणाले, मागील चार वर्षात रेल्वेत अनेक चांगली कामे केली. आरपीएफ जवानांचे समुपदेशन करून त्यांचा उत्साह वाढविला. चार वर्षात ३२३१ चांगली कामे केली. घरून पळालेल्या १०७२ मुलांना सुखरुप त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. गांजाच्या ५२ केसमध्ये ३५ जणांना अटक करून १.४ कोटीचा गांजा जप्त केला. दारूच्या ८५४ केसेसमध्ये ३११ तस्करांना अटक करून १.१५ कोटी रुपयांची दारु जप्त केली. मोबाईल आणि प्रवाशांचे सामान पळविण्याच्या १७६ प्रकरणात २१२ जणांना अटक करून २५.८४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ९० दलालांचा बंदोबस्त करून १.१३ कोटींच्या तिकीट जप्त केली. सोन्याचांदीचे दागिने विना कागदपत्र नेणाऱ्या ७ जणांकडून ३.११ कोटींचे दागिने जप्त केले. गुटखा तस्करीच्या २४ केसेस पकडल्या. मोबाईल हरविलेल्या २६४ जणांना त्यांचे मोबाईल परत केले. १६ हजार १६० अवैध व्हेंडरविरुद्ध कारवाई करून ३४७ जणांना तुरुंगात पाठविले. रेल्वेस्थानकावरील सर्व अवैध प्रवेशद्वारे बंद केल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागला. वर्धा, आमला आणि घोडाडोंगरी ठाणे तंबाखूमुक्त केल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला दपूम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांड्येय, सहायक सुरक्षा आयुक्त दीपकसिंग चौहान उपस्थित होते.सामाजिक कामातही आरपीएफ अग्रेसररेल्वे सुरक्षा दलाने मागील चार वर्षात १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्तदानाप्रति जनजागृती केली. आरपीएफच्या ५० जवानांनी अवयवदानाचा संकल्प केला. नो हॉर्न हा उपक्रम शहरात राबविला. मागील चार वर्षांपासून दर शनिवारी १०० कॅन्सरच्या रुग्णांना जेवण देण्यात येत असल्याचे सतीजा यांनी सांगितले.

 

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस