शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
3
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
4
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
5
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
6
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
7
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
8
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
9
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
10
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
11
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
12
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
13
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
14
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
15
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
16
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
17
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
18
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
19
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
20
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?

न्यायमूर्ती चांदीवाल यांचा अहवाल सार्वजनिक करावा

By दयानंद पाईकराव | Updated: July 18, 2024 13:46 IST

अनिल देशमुख : राष्ट्रवादीत शरद पवार गटात इनकमींग वाढणार

नागपूर : न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाने आपल्या अहवालात मला क्लिन चिट दिली. परंतु अनेकदा मागणी करूनही महायुतीच्या शासनाने हा अहवाल पटलावर ठेवला नाही. तसेच हा अहवाल जनतेसमोर आणला नाही. त्यामुळे हा अहवाल जनतेसमोर न आणल्यास आपण न्यायालयात जावू, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार) नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे दिला.

न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाच्या अहवालाबाबत प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशमुख म्हणाले, मी राज्याचा गृहमंत्री असताना माझ्यावर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप लावले होते. आरोपाची त्वरीत चौकशी करावी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार राज्य शासनाने उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश कैलासचंद चांदीवाल यांच्या माध्यमातून कमिशन ऑफ इन्क्वायरी ॲक्ट अंतर्गत उच्चस्तरीय चौकशी आयोगाची स्थापना करून चौकशीचे आदेश दिले. न्या. चांदीवाल आयोगाने ११ महिने चौकशी करून १४०० पानांचा अहवाल सादर केला. या अहवालात आपल्याला क्लिन चिट देण्यात आली. परंतु अनेकदा मागणी करूनही राज्य शासनाने अद्याप हा अहवाल पटलावर ठेऊन सार्वजनिक केला नाही. त्यामुळे राज्य शासन हा अहवाल जनतेसमोर आणत नसेल तर आपण न्यायालयात जाऊ, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार) शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, शैलेंद्र तिवारी, किशोर बेलसरे आदी उपस्थित होते. 

बाबा आत्रामांनी मुलीला सांभाळावेआपण अनिल देशमुख यांच्या विरोधात देशमुख घराण्यातीलच तगडा उमेदवार देऊ, असे वक्तव्य अहेरीचे आमदार तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले होते. त्यावर अनिल देशमुख यांनी आत्रामांची मुलगीच आमच्या गटात येण्याच्या तयारीत आहे. आत्रामांनी मुलीलाच सांभाळावे, असे वक्तव्य केले. तसेच नागपूर शहरात दोन जागा आणि नागपूर ग्रामीणमध्ये आणखी एक जागा वाढवून घेण्याचा आग्रह आम्ही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमच्याकडे इनकमींग वाढत आहेराज्यात सत्तारुढ असलेल्या भाजपातील १०५ आमदार नाराज आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या आमदारांना पहिल्या पंगतीत बसण्याचा मान मिळत असल्यामुळे भाजपचे आमदार खुलेआमपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (शरद पवार) इनकमींग वाढत आहे. नगरसेवकांपासून त्याची सुरुवात झाली आहे. अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. परंतु कोणाला घ्यायचे आणि कोणाला घ्यायचे नाही, याचा निर्णय सर्व नेतेमंडळी एकत्र बसून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखSharad Pawarशरद पवारnagpurनागपूर