शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जरा हटके! वैज्ञानिकांच्या संशोधनातून ‘ग्रीन’ फटाक्यांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 10:18 IST

देशातील विविध संशोधन संस्थांनी ‘ग्रीन’ फटाक्यांची निर्मिती केली आहे. या फटाक्यांचे बुधवारी ‘नीरी’मध्ये सादरीकरणदेखील करण्यात आले.

ठळक मुद्दे‘स्वास’, ‘सफल’, ‘स्टार’सह ‘ईकोफ्रेंडली’ दिवाळी‘नीरी’त झाले सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीतील फटाक्यांच्या प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयानेदेखील ताशेरे ओढल्यानंतर आता प्रदूषणविरहित दिवाळी कशी जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र लोकांना आतषबाजीचा आनंददेखील लुटता यावा व प्रदूषणदेखील होऊ नये यासाठी वैज्ञानिकांनीच पुढाकार घेतला. देशातील विविध संशोधन संस्थांनी ‘ग्रीन’ फटाक्यांची निर्मिती केली आहे. या फटाक्यांचे बुधवारी ‘नीरी’मध्ये सादरीकरणदेखील करण्यात आले.‘सीएसआयआर’अंतर्गत येणाऱ्या विविध प्रयोगशाळांमध्ये ‘ग्रीन’ फटाके निर्माण करण्यात आले आहेत. यांना ‘स्वास’ (सेफ वॉटर रिलिजर), सफल (सेफ मिनिमल अ‍ॅल्युमिनियम), ‘स्टार’ (सेफ थर्माईट क्रॅकर्स) अशी नावे देण्यात आली आहेत. या फटाक्यांचा आवाजदेखील कमी असून पर्यावरणाला लक्षात घेऊन हे फटाके बनविण्यात आले आहे. ‘सीएसआयआर’चे महासंचालक डॉ.शेखर मांडे, ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार व डॉ.शांतनू चौधरी यांच्या मार्गदर्शनात या फटाक्यांची निर्मिती झाली. ‘नीरी’त बुधवारी या ‘ग्रीन’ फटाक्यांचे सादरीकरण झाले.‘ग्रीन’ फटाक्यांमध्ये कुठलेही घातक रसायने नाहीत. तसेच फटाक्यांमधील विविध घटकांना हटवून कमी धोकादायक तत्वांचा वापर करण्यात आला आहे. फटाक्यांमधून निघणारा धूर, बारीक कण यांचे प्रमाणदेखील कमी असणार आहे. शिवाय ‘सल्फर डायआॅक्साईड’चे उत्सर्जन न करतादेखील फटाके तयार करण्याचा वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत, अशी माहिती वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक डॉ.साधना रायलु यांनी दिली.

‘नीरी’त उत्सर्जनाची चाचणी होणारपहिल्यांदाच ‘नीरी’मध्ये फटाक्यांच्या माध्यमातून होणाऱ्या उत्सर्जनाची चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. येथे पारंपरिक फटाके व ‘ग्रीन’ फटाक्यांवर अभ्यास करण्यात येणार आहे. दोन्हींमधून निघणारा धूर, आवाज, रासायनिक घटक इत्यादींची तुलना करण्यात येईल. याचा उपयोग भविष्यातील संशोधनासाठी होईल.

टॅग्स :environmentवातावरण