शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

जरा हटके! अपंगत्वावर मात करून बनला स्वाभिमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 10:08 IST

आयुष्यात आलेल्या आपत्तीने अनेकजण खचतात. नशिबाला दोष देत हताशपणे बसतात. मात्र शंकरनगरात राहणारे नितीन सोमकुवर याला अपवाद ठरले आहेत.

ठळक मुद्देएकाच हाताने काढतो पंक्चरशंकरनगरातील नितीनच्या परिश्रमाची चर्चा

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयुष्यात आलेल्या आपत्तीने अनेकजण खचतात. नशिबाला दोष देत हताशपणे बसतात. मात्र शंकरनगरात राहणारे नितीन सोमकुवर याला अपवाद ठरले आहेत. लहानपणी अर्धांगवायुमुळे एक हात आणि पाय लुळा पडला. परंतु या अपंगत्वावर अश्रु न ढाळता ते परिस्थितीला सामोरे गेले. आजोबांच्या दुकानात बसून एकाच हाताने चाक उतरविण्यापासून तर पक्चंर काढून चाक बसविण्यापर्यंतचे कसब अंगी बाणवले. ही जीद्दच आता त्यांचा जगण्याचा आधार आणि इतरांसाठी प्रेरणा ठरली आहे.नितीन सोमकुवर (३८) असे या व्यक्तीचे नाव आहे. नितीन आठ वर्षांचे असताना त्यांना अर्धांगवायु (पॅरालिसीस) झाला. यात त्यांचा उजवा हात आणि पाय निकामी झाला. त्यांना लहान बहीण असून तिचे लग्न झाले आहे.तर मोठा भाऊ त्याच्या कुटुंबीयांसोबत राहतो. मोठ्या भावावर अवलंबून राहण्यापेक्षा नितीनने स्वयंरोजगाराची कास धरली. त्यांच्या आजोबांचे पंक्चरचे दुकान होते. तेथेच नितीनने पंक्चर काढण्याचे काम शिकले. १९९५ पासून शंकरनगर पेट्रोल पंपाच्या शेजारी ते पंक्चरचे दुकान लावतात.सायकल, दुचाकी, कार आणि ट्रकचे मोठमोठे टायर ते सराईतपणे काढून पंक्चर काढतात. या कामातून त्यांना दिवसाकाठी २०० ते ३०० रुपये मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.शंकरनगर पेट्रोल पंपावरच त्यांची राहण्याची जागा आहे. सकाळी उठून फ्रेश झाले की ते आपल्या व्यवसायाला सुरुवात करतात. मागील २४ वर्षांपासून आपल्या हिमतीच्या भरवशावर इतरांपुढे हात न पसरता ते आयुष्य जगत आहेत. समाजात अनेकजण हात किंवा पाय निकामी झाल्यानंतर भीक मागतात किंवा इतरांवर अवलंबून राहतात. अशा व्यक्तींना नितीन यांचे काम नक्कीच प्रेरणा देणारे आहे.हिमतीने जगायला हवे!अपंगत्व आले तरी प्रत्येकाने आपला काहीतरी व्यवसाय करण्याची गरज आहे. इतरांवर अवलंबून न राहता आणि कुणापुढे हात न पसरता आपल्या हिमतीने स्वाभिमानाने जीवन जगले पाहिजेत, असे मत नितीन सोमकुवर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके