शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तिळे जन्मणाऱ्या महिलेच्या पाठीशी ‘जंगोराइतड्’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:35 IST

बाळाचा जन्म हा प्रत्येकच घरच्यांसाठी आनंदाचा क्षण असतो. जुळे झाले तर आनंद द्विगुणित होतो, मात्र तिळे होणार म्हटल्यावर जास्त आनंद होतो असे नाही. सुखरुप जन्माला आलेही तरी आर्थिक विवंचनेत असणाऱ्या गरीब कुटुंबासाठी तीन मुलांचा सांभाळ मोठी समस्या ठरतो. ‘ती’च्या व कुटुंबासमोरही हे संकट उभे ठाकले होते. मात्र या संकटसमयी जंगोराइतड आदिवासी विकास संस्थेने तिला आधार दिला. संस्थेने तिच्या बाळंतपणाचा खर्च उचलला आणि वर्षभर त्या बाळांची जबाबदारीही स्वीकारली.

ठळक मुद्देवर्षभर माता व बाळांचा करणार सांभाळ : गरीब महिलांना मिळतोय आधार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाळाचा जन्म हा प्रत्येकच घरच्यांसाठी आनंदाचा क्षण असतो. जुळे झाले तर आनंद द्विगुणित होतो, मात्र तिळे होणार म्हटल्यावर जास्त आनंद होतो असे नाही. सुखरुप जन्माला आलेही तरी आर्थिक विवंचनेत असणाऱ्या गरीब कुटुंबासाठी तीन मुलांचा सांभाळ मोठी समस्या ठरतो. ‘ती’च्या व कुटुंबासमोरही हे संकट उभे ठाकले होते. मात्र या संकटसमयी जंगोराइतड आदिवासी विकास संस्थेने तिला आधार दिला. संस्थेने तिच्या बाळंतपणाचा खर्च उचलला आणि वर्षभर त्या बाळांची जबाबदारीही स्वीकारली.या महिलेचे नाव नेहा आत्राम असे आहे. पांढराबोडी येथे राहणाऱ्या नेहाने ५ एप्रिलला दोन मुली व मुलाला जन्म दिला. एरवी अशावेळी मुले अ‍ॅबनॉर्मल जन्मण्याचा धोका अधिक असतो. मात्र तिन्ही गुटगुटीत मुलांना जन्म देणारी नेहा याबाबतीत सुदैवी ठरली. काही महिन्यापूर्वी मात्र नेहा व तिच्या कुटुंबासमोर चिंतेचे ढग जमा झाले होते. त्यावेळी नेहा धरमपेठच्या डॉ. स्मिता चतुर्वेदी यांच्याकडे ट्रीटमेंट घेत होती. आपल्या पोटात तीन मुले वाढताहेत हे जेव्हा तिच्या लक्षात आले, तेव्हा ती हादरलीच होती. एकतर तिला आणि बाळांना धोका होण्याची शक्यता भीतीचे कारण होते. नेहाचे पती एका कंपनीत कामाला जातात. आर्थिक परिस्थिती वाईट असल्याने तीन मुलांचा सांभाळ कसा करावा, हा प्रश्न तिच्या व कुटुंबाच्या समोर उभा ठाकला. जीवाचा धोका व गरिबीची चिंता यामुळे दोन मुलांना पोटातच नष्ट करावे का, हा विचारही तिच्या मनात घोळत होता. विज्ञानाच्या प्रगतीमुळे हे शक्यही झाले असते कदाचित.डॉ. स्मिता यांनी गरीब गरोदर महिलांसाठी काम करणाºया जंगोराइतड् आदिवासी विकास संस्थेचे अध्यक्ष प्रबोध वेखंडे यांना सांगितले. वेखंडे व संस्थेच्या इतर सहकाºयांनी नेहा व तिच्या कुटुंबाचे समुपदेशन करून दोन्ही पर्यायासाठी हवी ती मदत करण्याचा विश्वास दिला. संस्थेचा आधार मिळाल्याने नेहानेही तिळ्यांना जन्म देण्याचा निर्णय ठामपणे घेतला. तेव्हापासून ते बाळंतपण होईपर्यंत सर्व खर्च जंगोराइतड् संस्थेने केला आहे. यापुढे वर्षभर माता व तिन्ही बाळांचा औषधोपचार, आहार आणि इतर खर्च करण्याची जबाबदारी संस्थेने स्वीकारली आहे. त्यामुळे तिचे बाळंतपण सुखदायी ठरले असून बाळंत वेदनेतून तीही सुखावली आहे.काय आहे जंगोरातड् संस्थेचे कार्य?जंगोराइतड् ही संस्था गेल्या दोन वर्षापासून गरीब बाळंत महिलांसाठी कार्य करीत आहे. बाळंतपणाचा खर्चही न पेलणाऱ्या कुटुंबातील गरीब महिलांना औषधोपचार व डॉक्टरांचे समुपदेशन व बाळंतपणानंतर तीन महिने माता व बाळाच्या औषधोपचार व सकस आहाराची जबाबदारी संस्थेकडून उचलली जाते. यादरम्यान माता किंवा बाळाला काही आजार झाल्यास त्यांच्या आॅपरेशनपासून उपचारापर्यंतचा खर्च संस्थेद्वारे केला जातो. दोन वर्षात संस्थेने ४० महिलांना अशाप्रकारे मदत केली आहे. यावर्षी संस्थेने आतापर्यंत १५ महिलांच्या बाळंतपणाची जबाबदारी उचलली आहे. नेहाच्या बाळांचा वर्षभराचा खर्च आणि त्यानंतरही हवी तशी मदत करण्याचा विश्वास प्रबोध वेखंडे यांनी दिला.

टॅग्स :WomenमहिलाHealthआरोग्य