शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
3
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
4
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
5
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
6
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
9
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
10
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
11
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
12
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
13
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
15
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
16
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
17
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
18
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
19
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!

पाच जिल्ह्यात जूनचा पाऊस सरासरीच्या खालीच

By निशांत वानखेडे | Updated: June 30, 2025 20:16 IST

नागपुरात सर्वात कमी, भंडाऱ्यात ४० टक्क्याची कमतरता : वाशिम, बुलढाण्यात जादा

नागपूर : विदर्भातील पाच जिल्ह्यात जून महिन्यातील पाऊस निराश करणारा ठरला. नागपूर जिल्ह्यात सर्वात कमी ४४ टक्के कमी पावसाची नाेंद झाली. त्याखाली भंडाऱ्यात ४० टक्के कमी पाऊस झाला. बुलढाण्यात जादा, तर गडचिराेली, वाशिम व अकाेल्यात सरासरी पाऊस झाला. एकूणच विदर्भाची महिन्यातील सरासरी १२ टक्क्याने कमी आहे, पण ती सामान्य मानली जाते.

अनेक वर्षानंतर यंदा मान्सून महाराष्ट्राप्रमाणे विदर्भातही अतिशय लवकर दाखल झाला खरा, पण ताे पुढे पाेहचलाच नाही. तब्बल २२ दिवस ताे एकाच ठिकाणी रेंगाळत राहिला. सर्वच जिल्ह्यात पाेहचण्यासाठी उशीरही झाला. साधारणत: २३ जूनच्या रात्रीपासून बहुतेक भागात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर उघडझाप करीत आनंदसरी बरसल्या, पण त्यातही सातत्य नव्हते. केवळ वाशिम, बुलढाणा व अकाेला जिल्ह्यात मुसळधार पावसाने झाेडपले. त्यामुळे पेरणी केलेल्या धान्याच्या राेपांचीही नासधुस झाली. इतर जिल्ह्यात मात्र पावसाने निराश केले. महिना संपण्याच्या आदल्या दिवशीपासून चांगल्या पावसाचा अनुभव येत आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिराेली, गाेंदिया व यवतमाळात जाेरदार सरी बरसल्या, तर इतर जिल्ह्यात रिपरिप सुरू हाेती. विदर्भासह मध्य भारतात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने पुढचे काही दिवस चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

जून महिन्यात झालेला पाऊस (मि.मी.)जिल्हा             सामान्य पाऊस      झालेला पाऊस      कमी/जास्त/सामान्यनागपूर                   १७३.९                      ९७.९                            -४४भंडारा                    १८७.४                      १११.८                           -४०अमरावती               १४९.५                       १००                             -३३गाेंदिया                    १९६.५                     १३५.२                           -३०वर्धा                         १७०.२                      १३५.२                          -२१चंद्रपूर                     १८८.५                      १७३.७                   -८ (सामान्य)गडचिराेली              २२०.१                        २१७.८                  - १ (सामान्य)यवतमाळ                 १७३                          १६९.९                   - २ (सामान्य)अकाेला                  १४३.६                        १४३.२                      0 (सामान्य)वाशिम                   १७४.७                         १८३.१                   + ५ (सामान्य)बुलढाणा                 १३५.९                         १८१.१                    + ३३ (अधिक)विदर्भात एकूण        १७५.४                         १५५.२                  - १२ (सामान्य)

साेमवारच्या पावसाने शेतीला संजीवनीजूनचा शेवटचा दिवस साेमवारी विदर्भात पावसाने जाेरदार हजेरी लावली. सकाळपर्यंत चंद्रपूर व गाेंदियात ४३ मि.मी., भंडारा २२, गडचिराेली २० व यवतमाळात ११.४ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. इतरही जिल्ह्यात पावसाची रिपरिप चालली हाेती. दिवसभरातही थांबून थांबून पावसाच्या हलक्या सरी बरसत राहिल्या. नागपूर जिल्ह्यात सायंकाळी पावसाने चांगलाच जाेर दाखवला. या पावसामुळे चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतातील पिकांना संजीवनी मिळाली आहे.

टॅग्स :nagpurनागपूरmonsoonमोसमी पाऊस