शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

सणासुदीच्या कालावधीतील रेल्वेच्या बुकिंगवर आतापासूनच उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2023 20:00 IST

Nagpur News सणासुदीच्या कालावधीत भाविकांची विशिष्ट ठिकाणी देवदर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन दलालांनी त्यांची आर्थिक लूट करण्यासाठी आतापासूनच कारस्थान सुरू केले आहे.

नागपूर : सणासुदीच्या कालावधीत भाविकांची विशिष्ट ठिकाणी देवदर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन दलालांनी त्यांची आर्थिक लूट करण्यासाठी आतापासूनच कारस्थान सुरू केले आहे. त्यानुसार, गणेशोत्सवाच्या निमित्ताने मध्य रेल्वेने सुरू केलेल्या अग्रिम आरक्षणासाठी ऑनलाईन बुकिंग काऊंटरवर आतापासूनच उड्या पडत आहेत. दरम्यान, अशा प्रकारच्या तक्रारी वाढत असल्याने रेल्वे प्रशासनाने दलालांकडे नजर रोखली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्येही प्रवाशांची गर्दी वाढते. त्या काळात रिझर्वेशनही मिळत नाही. ते ध्यानात घेता यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांना सोयीचे व्हावे म्हणून मध्य रेल्वेने १५ ते २१ सप्टेंबर २०२३ या कालावधीत कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांसाठी अग्रिम आरक्षणाची सुविधा (एआरपी) मे २०२३ पासून उपलब्ध करून दिली आहे. दरदिवशी वेगवेगळ्या ट्रेनमध्ये एकूण ५०५८ बर्थची सोय आहे. अर्थात या सात दिवसांत ३५,४०६ सिटस् उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, सकाळी ८ वाजता ऑनलाईन बुकिंग सुरू होताच पहिल्या चार मिनिटांत (सकाळी ८.५९ वाजेपर्यंत) ५४, ४०१ तिकिटांची मागणी नोंदविण्यात आली. यात ५८७५ प्रवाशांनी प्रत्यक्ष काउंटरवर तर ४८,५२६ प्रवाशांकडून ऑनलाईन बुकिंग नोंदविण्यात आली. त्यासंबंधाने मोठ्या प्रमाणात प्रवाशांकडून तक्रारी झाल्यानंतर भारतीय रेल्वे प्रशासनाने त्या तक्रारीची दखल घेऊन बुकिंग प्रक्रिया तपासली असता दलालांचा संशयास्पद सहभाग अधोरेखित झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्या दलालांकडे नजर रोखली आहे. 

पहिल्या मिनिटातच अनेक तिकिटे बुकरेल्वेच्या कोणत्याही अधिकृत एजंटला बुकिंग काऊंटर सुरू झाल्यापासून पहिल्या १५ मिनिटांपर्यंत तिकिट बुक करण्याची परवानगी नसते. तरीसुद्धा पहिल्या एकाच मिनिटात अनेक तिकिटे बुक होतात. अशाच काही तिकिटांचे रेल्वे अधिकाऱ्यांनी विश्लेषण केले असता १८१ पीएनआर तिकिटांपैकी १०२ संशयास्पद दिसून आल्या. शिवाय १६४ जणांची आयडीही संशयास्पद वाटत असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याची वरिष्ठ पातळीवरून चाैकशी सुरू केली आहे.

दलालांकडून आर्थिक लूट

वेगवेगळ्या जणाच्या नावावर तिकिटे बुक करून दलाल नंतर त्या अव्वाच्या सव्वा किंमतीत विकतात. अशा प्रकारे रेल्वे प्रवाशांची दलालांकडून आर्थिक लूट केली जाते.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे