शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाच्या भीतीपोटी जुमलेबाजी ; अशोक चव्हाण यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 22:31 IST

मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान विधानसभा निवडणुकीतील निकालांमुळे केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती वाटत आहे. या दोन्ही सरकारने साडेचार वर्षात कोणतीही कामे केली नाहीत. त्यामुळे मतदारांना मते माण्याची सोय राहिली नाही. याच भीतीपोटी मोदी व फडणवीस यांनी आता ‘जुमलेबाजी पार्ट - २’ सुरू केली आहे, अशी परखड टीका काँग्रेसचे प्रदेशाध्य७ खा. अशोक चव्हाण यांनी केली.

ठळक मुद्देजनसंघर्ष यात्रेत रामटेक येथे जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्करामटेक : मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान विधानसभा निवडणुकीतील निकालांमुळे केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती वाटत आहे. या दोन्ही सरकारने साडेचार वर्षात कोणतीही कामे केली नाहीत. त्यामुळे मतदारांना मते माण्याची सोय राहिली नाही. याच भीतीपोटी मोदी व फडणवीस यांनी आता ‘जुमलेबाजी पार्ट - २’ सुरू केली आहे, अशी परखड टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याला नागपूर येथील दीक्षाभूमीवरून गुरुवारी सकाळी सुरुवात करण्यात आली. ही यात्रा दुपारी कामठी मार्गे रामटेक शहरात पोहोचली. रामटेक शहरात यात्रेचे जाहीर सभेत रुपांतर झाले. या वेळी चव्हाण बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, आ. विजय वडेट्टीवार, आ. नसीम खान, माजी मंत्री वसंतराव पुरके, अ.भा.काँग्रेस कमिटीचे सचिव व राज्याचे सहप्रभारी आशिष दुआ, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, मुनाफ हकीम, डॉ. अमोल देशमुख, अनंतराव घारड, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे आदी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, देशात सध्या परिवर्तनाचे वारे वाहात आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान या या तिन्ही राज्यात काँग्रेसने सत्ता सांभाळताच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. फडणवीस सरकाने दोन वर्षांपूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले नाही. महाराष्ट्र सध्या दुष्काळात होरपळत आहे. मात्र, शासनाच्यावतीने कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाही. शेतमालाचे भाव, पिण्याचे पाणी, गुरांचे वैरण, रोजगाराची कमतरता, बंद असलेले सोयाबीन, तूर, धान खरेदी केंद्र, विदर्भातील नवीन उद्योगाची वानवा, बेरोजगारी, नोटाबंदी यासह अनेक समस्यांनी आता गंभीर रूप धारण केले आहे. मात्र, हे प्रश्न सोडविण्यात भाजपा सरकार फेल ठरले, असा ठपका त्यांनी ठेवला.राजेंद्र मुळक यांनी प्रास्ताविकातून जनसंघर्ष यात्रेचा हेतू विशद केला. उदयसिंग यादव यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्रा