शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
4
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
5
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
6
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
7
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
8
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
9
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
10
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
11
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
12
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
13
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
14
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
15
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
16
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
17
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
18
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
19
ITR भरल्यानंतर आता तासाभरात परतावा! आयकर विभागाचा स्पीड पाहून नागरिक थक्क, जाणून घ्या कसं झालं शक्य?
20
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 

जुलैअखेरही नागपूर विभागातील धरणे कोरडीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 11:49 IST

जुलै महिना संपत आला आहे. परंतु नागपूर विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये २२ जुलैला केवळ ३१.४४ इतकाच पाणीसाठा आहे.

ठळक मुद्देमोठ्या प्रकल्पांत ३१.४४ टक्केच साठादमदार पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुलै महिना संपत आला आहे. परंतु नागपूर विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये २२ जुलैला केवळ ३१.४४ इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.पावसाळ्याचे दिवस आहे, परंतु काही अपवाद वगळल्यास अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. ६ जुलैला झालेल्या मुसळधार पावसाने विभागातील धरणे हाऊसफूल्ल होतील, अशी शक्यता होती. सहा तासात तब्बल २६३.५ मिमी विक्रमी पाऊस पडला. वडगाव-नांद धरणातील दरवाजे उघडण्याची वेळ आली. परंतु त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली. धरणे भरण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये २२ जुलै रोजी केवळ ३१.४४ टक्के इतकाच जलसाठा आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्याची एकूण क्षमता ३५५३.७७ दलघमी इतका असून २२ जुलैपर्यंत यात १११७.४१ दलघमी (३१.४४ टक्के) इतकाच पाणीसाठा आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह धरणाची पाणीसाठा क्षमता १०१६.८८ इतकी आहे. यात १९७.१२ दलघमी म्हणजे १९.३९ टक्के इतका पाणीसाठा आहे. यासोबतच कामठी खैरीमध्ये ६३.८० टक्के, रामटेकमध्ये ३३.२७ टक्के, लोवर नांद वणा ४९.५८ टक्के, वडगाव ४८.८५ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह ४२.४७ टक्के, सिरपूर २२.४३ टक्के, पुजारी टोला ६४.६५ टक्के, कालीसरार ६३.३५ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा २- १.७० टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा ९२.७२ टक्के, गडचिरोली जिल्ह्या दिना ६१.१० टक्के, वर्धा जिल्ह्यातील बोर २९.२८ टक्के, धाम २९.४९ टक्के, पोथरा ९९.२० टक्के, लोअर वर्धा टप्पा १- २४.६२ टक्के, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द टप्पा १ - २५.४१ आणि बावनथडी ३०.९१ टक्के इतका पाणीसाठा आहे.

असोलामेंढा व पोथरा भरलेविभागातील मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्प ९२.७२ टक्के इतके भरले आहे. परंतु त्याचा एकूण साठा केवळ ५२.३३ इतका आहे. तर वर्धा जिल्ह्यातील पोथरा प्रकल्प ९९.२० टक्के भरले. त्याची एकूण साठा क्षमताच ३५ दलघमी इतकी आहे. यासोबतच पुजारी टोला, कामठी खैरी, दिना, कालीसरार हे प्रकल्प ५० टक्केवर भरले आहेत.

येत्या दिवसात धरण भरण्याची शक्यताजलसंपदा विभागाने जारी केलेल्या एकूण पाणीसाठ्याच्या माहितीनुसार गेल्या वर्षी आजच्याच तारखेचा एकूण पाणीसाठा पाहिला तर तो केवळ २०. ७३ टक्के इतकाच होता. तेव्हा आॅगस्ट आणि सप्टेंबर महिना शिल्लक असल्याने येत्या दिवसात धरणे भरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Damधरण