शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

हातभट्टीच्या दारूसाठी वापरला जाणारा गूळ पकडला : मध्य प्रदेशातून तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 23:31 IST

हातभट्टीची दारू बनविण्यासाठी वापरला जाणारा काळा गूळ मध्य प्रदेशातून नागपुरात आणला जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) पथकाने सावनेरजवळ जप्त केला. दोन टन असलेल्या या गुळाची किंमत ४६ हजार रुपये आहे. महसूल चुकवून गुळाची तस्करी करणारा वाहन चालक मनोज शेंडे (वय २२, रा. बोरगाव (रेमंड), ता. सौंसर, छिंदवाडा) आणि वाहन मालक जगदीश मुन्नीलाल गुप्ता (वय ५६, रा. कोराडी) या दोघांना अटक करण्यात आली.

ठळक मुद्देगुळासह वाहनही जप्त, चालक, मालक गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हातभट्टीची दारू बनविण्यासाठी वापरला जाणारा काळा गूळ मध्य प्रदेशातून नागपुरात आणला जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) पथकाने सावनेरजवळ जप्त केला. दोन टन असलेल्या या गुळाची किंमत ४६ हजार रुपये आहे. महसूल चुकवून गुळाची तस्करी करणारा वाहन चालक मनोज शेंडे (वय २२, रा. बोरगाव (रेमंड), ता. सौंसर, छिंदवाडा) आणि वाहन मालक जगदीश मुन्नीलाल गुप्ता (वय ५६, रा. कोराडी) या दोघांना अटक करण्यात आली.गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिवसनखोरी आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू काढली जाते. त्यासाठी दारू गाळणारी मंडळी मध्य प्रदेशातून नियमित काळा गूळ मागवतात. नेहमीप्रमाणे मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात काळा गूळ आणला जाणार असल्याची माहिती एक्साईज अधिकाऱ्यांना मिळाली. त्या आधारे अधीक्षक प्रमोद सोनोने, उपअधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर, निरीक्षक सुभाष हनवते यांनी मध्य प्रदेशच्या सीमावर्ती नाक्यांवर सापळा लावून कारवाईचे आदेश दिले. मंगळवारी पहाटे सावनेरच्या सिरोंजी नाक्यावर एमएच ४०/ बीजी ०९६६ क्रमांकाची पिकअप व्हॅन येताना दिसल्याने एक्साईजच्या पथकाने ती थांबविली. तपासणीत व्हॅनमध्ये २ हजार १६० किलो काळा गूळ (भेल्या) आढळला. त्यानंतर केलेल्या चौकशीत वाहनचालक मनोज याने दिलेल्या माहितीवरून वाहन मालक जगदीश गुप्ता यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले. चौकशीत गुप्ता नेहमीच काळ्या गुळाची तस्करी करीत असल्याचे पुढे आले. गुप्ताविरुद्ध १५ मार्च २०१८, १०ऑगस्ट २०१७ तसेच १ सप्टेंबर २०१७ ला हातभट्टीच्या दारूसाठी काळ्या गुळाची तस्करी केल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. गुप्ताच्या सांगण्यावरून कोणतेही बिल न घेता महसूल चुकवून मध्य प्रदेशातून हा गूळ महाराष्ट्रात आणला जात असल्याचेही मनोजने एक्साईजच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी ४६ हजारांचा गूळ तसेच तीन लाखांचे वाहन जप्त केले. वाहन चालक मनोज आणि वाहन मालक गुप्ता या दोघांनाही अटक करण्यात आली. निरीक्षक केशव चौधरी, द्वितीय निरीक्षक बाळासाहेब भगत आणि रावसाहेब कोरे यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :raidधाडPoliceपोलिस