शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पत्रकाराची आई व मुलीचे अपहरण करून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 14:05 IST

नागपूर येथे एका न्यूज पोर्टलच्या पत्रकाराची आई व दीड वर्षाच्या मुलीचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आहे.

ठळक मुद्दे हत्येचे कारण गुलदस्त्यात : पत्रकारजगत हादरले

नागपूर : नागपुरातील गुन्ह्यांची मालिका संपता संपत नाही. आता पत्रकारांच्या कुटुंबियांनाही गुन्हेगार टार्गेट करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. नागपूर येथे एका न्यूज पोर्टलच्या पत्रकाराची आई व दीड वर्षाच्या मुलीचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. या घटनेमुळे पत्रकारच नव्हे तर नागपूर हादरून गेले आहे.रविकांत कांबळे असे पत्रकाराचे नाव आहे. ते पवननगर दिघोरी नाका उमरेड रोड येथे राहतात. नागपुरातील एका वेब न्यूज पोर्टलमध्ये ते क्राईम रिपोर्टर म्हणून ते कार्यरत आहेत. उषा सेवकदास कांबळे (५४) असे मृत आईचे तर राशी रविकांत कांबळे असे मृत चिमुकलीचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता रविकांत यांची आई व मुलीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर मध्यरात्री गळा आवळून हत्या करण्यात आली. तसेच दोघांचेही मृतदेह पोत्यात भरून ते उमरेड रोडवरील विहीरगाव येथील नाल्यात फेकले. रविवारी सकाळी १०.३० वाजता एका व्यक्तिला पोत्यात मृतदेह आढळून आला. त्याने लगेच पोलिसांचा सूचना दिली. दरम्यान शनिवारी सायंकाळीच रविकांत यांनी आई व मुलगी बेपत्ता असल्याची पोलीसात तक्रार दिली होती. त्यनुसार पोलिसांनी रविकांत यांना सूचित केले. ते घटनास्थळी गेले तेव्हा त्यांनी मृतदेहाची ओळख पटविली.पत्रकारांवर हल्ले हे होत असतात. परंतु एखाद्या पत्रकाराच्या आई व मुलीचा खून करण्याची ही नागपूरच्या इतिहासातील पहिलीच घटना होय. याबाबत माहिती होताच नागपुरातील पत्रकार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात तनावपूर्ण वातावरण पसरले आहे.

टॅग्स :Journalistपत्रकारnagpurनागपूर