शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार असल्याचे सांगून घातला गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:40 IST

स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगून एका व्यक्तीने लकडगंज येथील मनपा झोन कार्यालयात तोडफोड करून गोंधळ घातला. इतकेच नव्हे तर झोनच्या सहायक अधीक्षकांना मारहाणही केली. याप्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देगुन्हा दाखल : मनपा झोन कार्यालयात तोडफोड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगून एका व्यक्तीने लकडगंज येथील मनपा झोन कार्यालयात तोडफोड करून गोंधळ घातला. इतकेच नव्हे तर झोनच्या सहायक अधीक्षकांना मारहाणही केली. याप्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इंद्रमणी हौशिलाप्रसाद तिवारी (५८) रा. प्लॉट नं. १३६० देशपांडे ले-आऊट असे आरोपीचे नाव आहे. नरेंद्र बावनकर (५२) रा. न्यू डायमंडनगर असे फिर्यादीचे नाव आहे बावनकर हे महापालिकेच्या लकडगंज झोनमध्ये सहायक अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. बावनकर यांच्या तक्रारीनुसार मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजता बावनकर आपल्या कार्यालयात ड्युटीवर असताना आरोपी इंद्रमणी तिवारी तेथे आला त्याने स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगितले. तसेच त्याने २००४ साली ७ हजार रुपये टॅक्स भरला होता. त्या रकमेच्या व्याजाची रक्कम तो परत मागू लागला यावर बावनकर यांनी लेखी अर्ज करण्याचा सल्ला दिला. परंतु तिवारी संतापला त्याने बावनकर व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. इतकेच नव्हे तर खुर्च्या आणि कॉम्प्युटर फेकफाक करीत तोडफोड केली. ही घटना कार्यालयातील सीसीटीव्हीमध्ये सुद्धा कैद झाली आहे. फिर्यादी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून लकडगंजच्या एपीआय राखी गेडाम यांनी आरोपीविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे व सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJournalistपत्रकार