शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

सहआयुक्त रवींद्र कदम यांनी स्वीकारला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 23:48 IST

सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी बुधवारी सहपोलीस आयुक्तांचा पदभार स्वीकारला. कदम हे सुद्धा पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांच्याप्रमाणे नागपूरशी परिचित आहेत. शहराला पहिल्यांदाच पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील अधिकारी हे नागपूरशी परिचित असलेले मिळाले.

ठळक मुद्देपहिल्यांदाच नागपूरशी परिचित अधिकारी मिळाले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी बुधवारी सहपोलीस आयुक्तांचा पदभार स्वीकारला. कदम हे सुद्धा पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांच्याप्रमाणे नागपूरशी परिचित आहेत. शहराला पहिल्यांदाच पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील अधिकारी हे नागपूरशी परिचित असलेले मिळाले.कदम हे १९८३ मध्ये डीवायएसपी म्हणून पोलीस विभागात रुजू झाले. त्यांनी १९८५ मध्ये मालेगावमध्ये डीवायएसपी म्हणून पोलीस सेवा सुरू केली. यानंतर सहायक पोलीस आयुक्त (सदर), एसआयडी, अतिरिक्त अधीक्षक गडचिरोली, पोलीस अधीक्षक (एसीबी), डीसीपी मुंबई, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, औरंगाबाद आणि पुणे, उपमहानिरीक्षक (एटीएस), उपमहानिरीक्षक (एएनओ), अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) आणि पोलीस महानिरीक्षक पदावर काम केले आहे. परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदावरून १४ जानेवारी २०१७ रोजी त्यांची सहपोलीस आयुक्त पुणे येथे बदली झाली होती.कदम यांना १९९५ मध्ये भारतीय पोलीस सेवेत सामील करण्यात आले. त्यांनी अनेक वर्षे नक्षलविरोधी अभियानाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या नेतृत्वात पोलिसांनी अनेक यश प्राप्त केले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सहपोलीस आयुक्तांकडे असते. संजय सक्सेना यांच्यानंतर कुणीही या पदावर विशेष पकड बनवू शकले नाही. परंतु येत्या दिवसात ही कमतरता दूर होईल. कदम यांनी बुधवारी सकाळी पदभार स्वीकारला. अप्पर पोलीस आयुक्त श्यामराव दिगांवकर यांनी त्यांचे स्वागत केले.

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालयnagpurनागपूर