शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

उपचारासाठी नागपुरात आलेल्या दाम्पत्याचे सव्वादोन लाखांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 14:45 IST

उपचारासाठी नागपुरात आलेल्या भंडारा जिल्ह्यातील दाम्पत्याचे साडेसात तोळ्यांचे सोन्याचे दागिने अज्ञात आरोपीने लंपास केले. गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास मोरभवन ते रेशिमबाग मार्गावर धावत्या आॅटोत ही धाडसी चोरीची घटना घडली.

ठळक मुद्देधावत्या आॅटोत चोरीसक्करदरा ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपचारासाठी नागपुरात आलेल्या भंडारा जिल्ह्यातील दाम्पत्याचे साडेसात तोळ्यांचे सोन्याचे दागिने अज्ञात आरोपीने लंपास केले. गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास मोरभवन ते रेशिमबाग मार्गावर धावत्या आॅटोत ही धाडसी चोरीची घटना घडली.मौदा (जि. भंडारा) येथील कालीमातानगरात राहणारे अशोक गुलाबराव बोंढरे (वय ६०) हे गुरुवारी दुपारी औषधोपचारासाठी नागपुरात आले. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी आपले दागिने जवळच्या कापडी बॅगमध्ये ठेवले होते. मोरभवनमधून बोंढरे दाम्पत्य सक्करद-यातील एका हॉस्पिटलमध्ये जायला निघाले. त्यांच्यासोबत २५ ते ३० वयोगटातील ३ व्यक्ती आॅटोत बसले. हे तिघेही रेशिमबाग चौकाजवळ आॅटोतून उतरले. बोंढरे दाम्पत्य हॉस्पिटलमध्ये पोहचले. त्यांनी तेथे आपली पिशवी तपासली असता त्यातील रक्कम तसेच सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सक्करदरा ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. ही चोरी ‘त्या’ तिघांनीच केली असावी, असा संशय आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्याचे पोलीस प्रयत्न करीत आहेत.विशेष म्हणजे, चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे सव्वादोन ते अडीच लाख रुपये असली तरी पोलिसांनी मात्र, जुन्या खरेदी दराप्रमाणे या दागिन्यांची किंमत केवळ १ लाख, २६ हजार नोंदवली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी