रोख रकमेसह दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:07 IST2021-03-29T04:07:01+5:302021-03-29T04:07:01+5:30
खापरखेडा : अज्ञात चोरट्याने घरफोडी करीत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून ...

रोख रकमेसह दागिने लंपास
खापरखेडा : अज्ञात चोरट्याने घरफोडी करीत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना खापरखेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमथी येथे शनिवारी (दि.२७) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
सुधाकर विठाेबाजी तकीत (७४, रा. गुमथी, ता. कामठी) हे आपल्या घरी झाेपले असताना, चोरट्याने घरात प्रवेश केला. यात चोरट्याने बेडरूममध्ये असलेल्या दाेन कपाटात ठेवलेले ५० हजार रुपये किमतीचे साेन्याचे दागिने, राेख ३० हजार रुपये तसेच पाच हजार रुपये किमतीचे वापरातील कपडे व साड्या असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही बाब लक्षात येताच तकीत यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला. तपास पोलीस उपनिरीक्षक सूर्यप्रकाश मिश्रा करीत आहेत.