शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावरील विदर्भ एक्स्प्रेसमधून पावणेतीन लाखाचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 12:32 IST

मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसमधून २ लाख ७६ हजार १०४ रुपये किमतीचे दागिने पळविल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देपोलिसांचा तरुणीवर संशय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसमधून २ लाख ७६ हजार १०४ रुपये किमतीचे दागिने पळविल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.जयंत देवेंद्रभाई जसानी (७१) रा. गोंदिया हे आपल्या पत्नीसह मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसने गोंदियाला जात होते. ए-३ कोचमधील ३७, ३९ या बर्थवरून ते प्रवास करीत होते. विदर्भ एक्स्प्रेस सकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर आली. दरम्यान जयंत कोचच्या बाहेर आले. त्यांच्या पत्नी बर्थवर झोपल्या होत्या. त्यांच्या उषाखाली असलेली पर्स अज्ञात आरोपीने पळविली. पर्समध्ये सोन्याच्या बांगड्या, सोनसाखळी (२), मंगळसूत्र डायमंड पेंडंटसह, नथ, मनगटी घड्याळ आणि २० हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ७६ हजार १०४ रुपये किमतीचा मुद्देमाल होता. याप्रकरणी गोंदिया लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे. दरम्यान सीसीटीव्हीत संपूर्ण प्लॅटफार्मचे चित्रीकरण कव्हर होत नसल्यामुळे सीसीटीव्हीत काहीच आढळले नाही. नागपूर स्थानकावर विदर्भ एक्स्प्रेस थांबल्यानंतर एक २० ते २२ वयोगटातील तरुणी गाडीत बसली. जीन्स आणि टी शर्ट घातलेल्या या तरुणीवर लोहमार्ग पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हा