शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जेट एअरवेजवर आर्थिक भरपाईचा दावा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:05 IST

दिल्लीहून अमेरिकेच्या सॅनफ्रॅन्सिस्कोला पहाटे ३ वाजता जाणारे आंतरराष्ट्रीय विमान जेट एअरवेज कंपनीच्या चुकीने सुटल्यामुळे कंपनीवर आर्थिक भरपाईचा दावा करणार असल्याची माहिती जेट एअरवेज कंपनीच्या नागपूर-दिल्ली विमानातील प्रवासी व वरिष्ठ नागरिक राजेंद्र वानखेडे आणि छाया वानखेडे या दाम्पत्याने लोकमतशी बोलताना दिली.

ठळक मुद्दे प्रवासी राजेंद्र वानखेडे : कंपनीच्या चुकीने अमेरिकेचे विमान सुटले

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दिल्लीहून अमेरिकेच्या सॅनफ्रॅन्सिस्कोला पहाटे ३ वाजता जाणारे आंतरराष्ट्रीय विमान जेट एअरवेज कंपनीच्या चुकीने सुटल्यामुळे कंपनीवर आर्थिक भरपाईचा दावा करणार असल्याची माहिती जेट एअरवेज कंपनीच्या नागपूर-दिल्ली विमानातील प्रवासी व वरिष्ठ नागरिक राजेंद्र वानखेडे आणि छाया वानखेडे या दाम्पत्याने लोकमतशी बोलताना दिली.गुरुवार, ५ एप्रिलला नागपूरहून दिल्लीला सायंकाळी ५.२० वाजता जाणारे जेट एअरवेजचे विमान रात्री १२ नंतरही निघाले नव्हते. सायंकाळी ४.४५ वाजता विमानात बसविल्यानंतर रात्री ९ वाजता विमानात बिघाड झाल्याचे कारण सांगून विमानातून खाली उतरविले. जवळपास चार तास विमानातील एसी बंद होता. श्वसनाचा त्रास झाला. कंपनीच्या अधिकाऱ्याने साधी विचारपूस केली नाही वा खाण्यास काहीही दिली नाही. वयस्क असल्यामुळे मानसिक त्रास झाला. दिल्लीत वेळेवर नाही पोहोचल्यास अमेरिकेला कसे जाणार, अशी भीती मनात होती. अखेर दिल्ली न जाण्याचा आणि अमेरिका वारी रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोघांचे नागपूर-दिल्ली प्रवासाची रक्कम आणि दिल्ली ते सॅनफ्रॅन्सिस्को प्रवासाचे दीड लाख रुपये वाया गेले. रात्री १२ वाजता नागपुरात भाच्याकडे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.सॅनफ्रॅन्सिस्कोच्या फ्रिमोन्ट शहरात मुलगी आणि जावई राहतात. त्यांनी आमचे विमानाचे तिकीट काढले होते. विमान सुटल्यामुळे त्यांनी पुन्हा आमच्या दोघांचे रविवारचे दिल्ली ते सॅनफ्रन्सिस्कोचे तिकीट काढले. त्यासाठी त्यांना जवळपास भारतीय चलनात ३.५ लाख रुपये खर्च आला. शिवाय नागपूर ते दिल्लीकरिता विमानाच्या तिकिटाचे अतिरिक्त पैसे मोजावे लागले. आता रविवारी सकाळी ८.३० वाजता दिल्लीला आणि त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता एअर इंडियाच्या विमानाने सॅनफ्रॅन्सिस्कोला रवाना होणार आहे.या प्रकरणी वकिलांशी चर्चा केल्यानंतर जेट एअरवेज कंपनीवर आर्थिक भरपाईचा दावा टाकण्याचा निर्णय घेतला. वकिलांनी पासपोर्ट, तिकिटे आणि आधारची झेरॉक्स मागितली आहे. आम्ही सहा महिने अमेरिकेत मुलीकडे राहणार आहे. केस कोर्टात दाखल करण्यासाठी मुलगा डॉ. शिरीष वानखेडे वकिलांना मदत करणार आहे. विमान रद्द झाल्याचे सांगितल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत कंपनीच्या अधिकाºयांनी दिलेली वागणूक अतिशय वेदनादायी होती. आमच्यासोबत २०० प्रवाशांना त्रास झाला. कंपनीला धडा शिकविण्यासाठी कोर्टात दावा टाकण्याचा निर्णय घेतल्याचे राजेंद्र वानखेडे यांनी सांगितले.

टॅग्स :Jet Airwaysजेट एअरवेजnagpurनागपूर