शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

एलेक्सिस हॉस्पिटलला जेसीआय गोल्ड सील मान्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 21:55 IST

एलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे ‘जॉईंट कमिशन इंटरनॅशनल’कडून (जेसीआय) सुवर्ण सील मान्यता प्राप्त करणारे मध्य भारतातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे, तर देशातील ३९ वे हॉस्पिटल असल्याची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देमध्य भारतातील पहिले हॉस्पिटल : देशातील ३९ वे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे ‘जॉईंट कमिशन इंटरनॅशनल’कडून (जेसीआय) सुवर्ण सील मान्यता प्राप्त करणारे मध्य भारतातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे, तर देशातील ३९ वे हॉस्पिटल असल्याची नोंद झाली आहे. अद्ययावत उपचार प्रणाली, दर्जेदार आरोग्य सेवा व रुग्णांसाठी असलेल्या वचनबद्धतेसाठी ही मान्यता सर्वात मोठे ‘हेल्थकेअर अक्रेडिटर’ असलेल्या ‘जेसीआय’ने नागपूरच्या एलेक्सिस हॉस्पिटलला दिली आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक ताहेर शम्स यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.यावेळी एलेक्सिस हॉस्पिटलचे सीईओ सूरज त्रिपाठी उपस्थित होते. ताहेर शम्स म्हणाले, आंतरराष्ट्रीयआरोग्य सेवा अधिकृततेसाठी ‘जेसीआय’ गुणवत्ता आणि सुरक्षा यांच्या सुधारेणसाठी काम करते. यामुळे हॉस्पिटलला मिळालेला हा सन्मान मोठा आहे. गुणवत्तापूर्ण रुग्णसेवेचे हे एकप्रकारे प्रमाणपत्रच आहे. या मान्यतेमुळे वैद्यकीय सेवेतील गुणवत्तेची एक पायरी आम्ही गाठली आहे. एलेक्सिस दर्जेदार आरोग्य सेवेसाठी निरंतर प्रयत्नशील राहील. ‘एनएबीएच’ आणि ‘एनएबीएल’नंतर ‘जेसीआय’कडूनही मिळालेल्या मान्यतेचा आम्हाला अभिमान आहे. ‘जेसीआय’ ही २० हजाराहून जास्त संस्थांचे मूल्यांकन करते. यामुळे कोणत्याही रुग्णालयासाठी जेसीआय असणे महत्त्वाचे ठरते. ही मान्यता ११९८ क्लिनिकल पॅरामीटरचे पालन केल्यावरच मिळते. एलेक्सिस हॉस्पिटल नागपूर, हे जगातील नवीनतम रुग्णालयांपैकी एक आहे आणि स्थापनेपासून ३२ महिन्यांच्या कालावधीत ही मान्यता प्राप्त झाली आहे.सूरज त्रिपाठी म्हणाले, ‘जेसीआय’चा मान एलेक्सिस हॉस्पिटलपुरताच मर्यादित नसून संपूर्ण नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. जगभरात १०९० रुग्णालये आहेत आणि त्यापैकी भारतातील ३९ रुग्णालयांनाच हा सन्मान प्राप्त झाला आहे. हे केवळ आमच्या रुग्णांंमुळेच शक्य झाले आहे. मध्य भारतातील गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा आणि रुग्ण सुरक्षा पुरविणारे सर्वाेत्तम रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या ‘एलेक्सिस’च्या शिरपेचात आणखी एक मानेचा तुरा रोवला गेला आहे. रुग्णांच्या काळजीत आंतरराष्ट्रीय मानके जपण्यासाठी आम्ही निरंतर प्रयत्न करीत असतो. या मान्यतेमुळे भारतात आरोग्य सेवेचा मानदंड उंचावेल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMediaमाध्यमे