शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

जरा हटके : चालती फिरती टेलिफोन ‘डिरेक्टरी’ ; प्रेमराज दवंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 22:18 IST

कुणाला अमूक व्यक्तीचा मोबाईल नंबर मागितल्यास, आठवत नाही...थांब मोबाईलमध्ये आहे. बिझनेस कार्ड पाठवतो, कुठल्याही कार्यालयात, घराघरांमध्ये किंवा सार्वजनिक स्थळी सहज ऐकायला मिळणारे हे वाक्य. परंतु एक व्यक्ती अशीही आहे जी चालता-फिरता टेलिफोन ‘डिरेक्टरी’ आहे. त्याला एकदा नंबर सांगितल्यास विसरत नाही. त्याच्या ‘मेमरी’मध्ये कायमचा ‘सेव्ह’ होतो. विशेष म्हणजे, या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये एकही नंबर ‘सेव्ह’ नाही. या अफलातून व्यक्तीचे नाव प्रेमराज लक्ष्मण दवंडे.

ठळक मुद्दे शेकडो मोबाईल नंबर तोंडपाठआरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात शिपाई बारावी नापास

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुणाला अमूक व्यक्तीचा मोबाईल नंबर मागितल्यास, आठवत नाही...थांब मोबाईलमध्ये आहे. बिझनेस कार्ड पाठवतो, कुठल्याही कार्यालयात, घराघरांमध्ये किंवा सार्वजनिक स्थळी सहज ऐकायला मिळणारे हे वाक्य. परंतु एक व्यक्ती अशीही आहे जी चालता-फिरता टेलिफोन ‘डिरेक्टरी’ आहे. त्याला एकदा नंबर सांगितल्यास विसरत नाही. त्याच्या ‘मेमरी’मध्ये कायमचा ‘सेव्ह’ होतो. विशेष म्हणजे, या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये एकही नंबर ‘सेव्ह’ नाही. या अफलातून व्यक्तीचे नाव प्रेमराज लक्ष्मण दवंडे.प्रेमराज हे आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात शिपाई म्हणून कार्यरत आहे. बारावी नापास असलेले परंतु कुठलाही नंबर सांगा ते नेहमीच लक्षात ठेवणारे प्रेमराज याची आरोग्य विभागाच्या माताकचेरी परिसरात वेगळी ओळख आहे. येथील अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर त्यांना तोंडपाठ आहेत. एखाद्या अधिकाऱ्याला तातडीने कुणाचा नंबर हवा असल्यास ते आवर्जून प्रेमराजला फोन करतात. विशेषत: कार्यालयीन सुटीच्या दिवशी किंवा रात्री हमखास ‘प्रेमराजला’ फोन येतो.प्रेमराजची परीक्षा पाहण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्याला आपला मोबाईल नंबर सांगून तो नंबर अमूक अधिकाऱ्यांना सांगण्यास सांगितला. त्या अधिकाऱ्याने दोन दिवसानंतर तो नंबर पुन्हा पे्रमराजला विचारला असता त्याने न चुकता सांगितला. प्रेमराजकडे मोबाईल आहे, पण एकही नंबर ‘सेव्ह’ नाही. तो मोबाईलचा उपयोग केवळ संवाद साधण्यासाठी करतो. त्याला बोलते केल्यावर म्हणाला, नोकरीला लागलो त्यावेळी मोबाईल फोन नव्हता. सर्व कामे फॅक्सवर व्हायची. सहा जिल्ह्यांना फॅक्स करावे लागायचे. त्यांची माहिती त्यांना टेलिफोनवरून द्यावी लागायची. अनेक गोपनीय फॅक्स असल्याने नंबर चुकू न देण्याची ताकीद असायची. त्यामुळे विशिष्ट जिल्ह्याचे विशिष्ट नंबर, कार्यालयाचे नंबर व संबंधित अधिकाऱ्यांचे नंबर पाठ करणे सुरू केले. परंतु लक्षात राहत नव्हते. मात्र व्यक्तीचा चेहरा किंवा त्याची विशिष्ट ओळख व नंबर डोळ्यासमोर आणल्यास तो नंबर लक्षात राहत असल्याचे लक्षात आले. ही पद्धती विकसित केली आणि पुढे कामाचा हा भाग सवयीचा झाला, असेही तो म्हणाला.कामाचा ताण व मोबाईलच्या अतिवापरामुळे रोजच्या महत्त्वाच्या गोष्टीही विसरण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पाठ असलेले मोबाईल नंबर्स किंवा रोजच्या घडामोडी तरुणाईच्या लक्षात राहत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यात बारावी नापास प्रेमराजने नंबर लक्षात ठेवण्याची आत्मसात केलेली विशिष्ट शैली कौतुकास्पद आहे.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेMobileमोबाइल