शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जरा हटके : अहो ! रस्ता चोरीला गेला, पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 20:33 IST

पोलीस ठाण्यात दररोज चोरीच्या शेकडो तक्रारी दाखल होतात. परंतु गुरुवारी मानकापूरमधील भारतीयनगरातील नागरिकांनी चक्क रस्ता चोरीला गेल्याची तक्रार दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली. नागरिकांच्या तक्रारीवर नेमकी कोणती कारवाई करावी असा पोलिसांना प्रश्न पडला. परंतु नागरिकांनी रस्त्याबाबतचे पुरावे सादर केल्यानंतर पोलिसांनी तक्रार घेतली.

ठळक मुद्देनागपुरातील भारतीयनगराच्या म्हाडा वसाहतीतील लोकांची मानकापूर पोलीस ठाण्याला धडक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस ठाण्यात दररोज चोरीच्या शेकडो तक्रारी दाखल होतात. परंतु गुरुवारी मानकापूरमधील भारतीयनगरातील नागरिकांनी चक्क रस्ता चोरीला गेल्याची तक्रार दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली. नागरिकांच्या तक्रारीवर नेमकी कोणती कारवाई करावी असा पोलिसांना प्रश्न पडला. परंतु नागरिकांनी रस्त्याबाबतचे पुरावे सादर केल्यानंतर पोलिसांनी तक्रार घेतली.भारतीयनगरात म्हाडाने १९९५ मध्ये वसाहत तयार केली. या वसाहतीत १२ मीटर रुंद रस्ता असल्याची नोंदही नकाशात करण्यात आली. हा रस्ता तयार करण्याची मागणी वसाहतीतील नागरिकांनी प्रशासनाकडे व राजकीय नेत्यांकडे केली. परंतु प्रत्येक वेळी त्यांना केवळ आश्वासने देण्यात आलीत. रस्त्याची मागणी सुरू असताना एका धार्मिक ट्रस्टने या रस्त्यावर अतिक्रमण करून त्यावर भिंत बांधली. त्यामुळे वसाहतीतील नागरिकांनी या अतिक्रमणाविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर सुधार प्रन्यासकडे निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यावर काहीच कारवाई झाली नाही. रस्ता बंद झाल्यामुळे नागरिकांना घरी जाण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. प्रशासन याबाबत काहीच कारवाई करण्यास तयार नसल्यामुळे रहिवाशांचा नाईलाज झाला आहे. अखेर बहुउद्देशीय सेवा अँड वेलफेअर संस्थेचे सचिव आर.बी. वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली वसाहतीतील नागरिकांनी मानकापूर पोलीस ठाण्यात रस्ता चोरीला गेल्याची तक्रार नोंदविली.चोरी झाल्याचे केले पुरावे सादररस्ता चोरीला गेल्याचे पुरावे नागरिकांनी मानकापूर पोलीस ठाण्यात सादर केले. यात माहितीच्या अधिकारात मिळालेले १२ मीटर रुंदीचा रस्ता असलेले नागपूर सुधार प्रन्यासच्या नगर रचना विभागाचे पत्र, रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत नागरिकांनी वेळोवेळी दिलेल्या निवेदनांच्या प्रतीही पोलिसांना दाखविण्यात आल्या. १९९५ मध्ये मंजूर रस्ता नकाशात असल्याचे नागरिकांनी पोलिसांच्या लक्षात आणून दिले. अखेर पोलिसांनी नागरिकांची तक्रार दाखल करून घेतली.रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोयरस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांनी नगरसेवकांकडे केली. परंतु डांबरीकरण करण्यात आले नसल्याने रस्ता कच्चा राहिला. या रस्त्याचा वापर नागरिक बाजाराला जाण्यासाठी, गोधणीला आणि मानकापूर रिंग रोडकडे जाण्यासाठी करीत होते. या रस्त्यावरून लहान मुले शाळेत जात होती. जवळचा रस्ता असल्यामुळे मुलांना शाळेत जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा होता. परंतु हा रस्ताच गायब झाल्यामुळे नागरिकांची आणि शाळकरी मुलांची गैरसोय होत आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेtheftचोरी