शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जरा हटके : पतीने केली पत्नीच्या घरात चोरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 20:58 IST

विसंवादामुळे वेगळीकडे राहणाऱ्या पतीने आपल्या घरात येऊन कपाटाचे लॉकर तोडले आणि त्यातील सोन्याचांदीचे तसेच हिऱ्याचे २६ लाख, ५५ हजारांचे दागिने लंपास केल्याची तक्रार एका महिलेने मानकापूर पोलिसांकडे केली आहे.

ठळक मुद्देपत्नी आणि मुलाचे लॉकर तोडले : सोने-हिऱ्याचे दागिने लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विसंवादामुळे वेगळीकडे राहणाऱ्या पतीने आपल्या घरात येऊन कपाटाचे लॉकर तोडले आणि त्यातील सोन्याचांदीचे तसेच हिऱ्याचे २६ लाख, ५५ हजारांचे दागिने लंपास केल्याची तक्रार एका महिलेने मानकापूर पोलिसांकडे केली आहे.गायत्री नितीन सिन्हा (वय ३७) असे तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. त्या गोधनी मार्गावरील कोलते ले-आऊटमध्ये राहतात. जरीपटक्यात त्यांची पॅथालॉजी लॅब आहे. तर, त्यांचे पती नितीन नंदकिशोर सिन्हा (वय ४१) बेसा येथील अजय पांडेंच्या घरात भाड्याने राहतात. काँग्रेसनगर चौकातील एका हॉटेलमध्ये नितीन मोठ्या हुद्यावर कार्यरत आहेत.सिन्हा पती-पत्नीत गेल्या चार महिन्यांपासून वाद सुरू असून, तो टोकाला गेल्यामुळे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. मात्र, सुटीच्या दिवशी नितीन त्यांच्या मुलांना भेटण्यासाठी गोधनीतील घरी येतो. रविवारी दुपारी ४ च्या सुमारास नेहमीप्रमाणे नितीन आपल्या मुलांना भेटण्यासाठी गोधनीतील घरी आले. काही वेळेनंतर त्यांनी शयनकक्षातून पत्नी आणि मुलाला दुसऱ्या रूममध्ये जाण्यास सांगितले. त्यानंतर आतमधून दार लावून घेत लाकडी कपाटाचे लॉकर तोडले. या लॉकरमध्ये सोन्याचांदीचे तसेच हिऱ्याचे दागिने होते. ते सर्व नितीन यांनी चोरून नेले. ते निघून गेल्यानंतर चोरीची बाब पत्नीच्या लक्षात आली. त्यांनी नितीनला फोन केला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गायत्री सिन्हा यांनी मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. नितीन यांनी चोरून नेलेल्या दागिन्यांची किंमत २६ लाख, ५५ हजार असल्याचे सिन्हा यांनी तक्रारीत नमूद केले.पोलिसांची झाली गोचीमानकापूरचे एएसआय एजाज शेख यांनी गायत्री सिन्हा यांच्या तक्रारीवरून त्यांचे पती नितीन सिन्हा यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. मात्र या प्रकरणात मानकापूर पोलिसांची चांगलीच गोची झाली आहे. कारण पोलिसांनी नितीन सिन्हा यांच्याशी संपर्क करून त्यांना या चोरीबाबत विचारणा केली असता त्यांनी चोरीचा इन्कार करून चक्क कानावर हात ठेवले. माझ्याच घरात, माझ्याच दागिन्यांची मी कशाला चोरी करणार, असा प्रतिप्रश्न त्यांनी पोलिसांना केला. मी विकत घेतलेले दागिने सोबत नेले, ती चोरी कशी होऊ शकते, असा सवालही नितीन सिन्हा यांनी केला. त्यामुळे पोलीस संभ्रमावस्थेत सापडले आहे.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेtheftचोरी