जनआक्राेशच्या कार्यकर्त्यांनी अमरावती येथे जयस्तंभ चाैकात फलक लावून लाेकांना हाॅर्न न वाजविण्याचे आवाहन केले. याशिवाय नागपुरात ऑरेंज सिटी चाैक व मंगलमूर्ती चाैक त्रिमूर्तीनगर येथे जनजागृती उपक्रम घेण्यात आला. वाहनांच्या गाेंगाटामुळे ध्वनिप्रदूषण त्रासदायक ठरत असून, गेल्या काही वर्षांत गाेंगाटाचा स्तर प्रचंड वाढला आहे व नागरिकांच्या आराेग्यावर विपरीत परिणाम हाेत आहेत. याबाबत लाेकांना जागृत करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आल्याचे रवींद्र कासखेडीकर यांनी सांगितले. या अभियानात अमरावती येथे नरेंद्र केवले, प्रवीण चापाेरकर, यश सुनील सराेदे, किशाेर कलाेती, निशांत जाेध, करण धाेटे आणि नागपूर टीमचे संजय वझलवार, संजय डबली, आशिष नाईक, डाॅ. रवींद्र हरिदास, अशाेक करंदीकर, सुनिती देव, श्याम भालेराव, मनाेज बल्लाळ, ललित तपासे, दत्ता सगदेव, शशिकांत नाकाडे, संजय ठकरे, मनाेहर लाेटावार, मनेंद्र मिश्रा, प्रकाश खांडेकर, रमेश शहारे आदींचा सहभाग हाेता.
जनआक्राेशने राबविले नाे हाॅर्न डे अभियान ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:06 IST