लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सब्बल मारून दाम्पत्यास गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने गुरुवारी सहा वर्षांचा कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. सी. मुनघाटे यांनी हा निर्णय दिला. ही घटना यशोधरानगर येथे घडली होती.सुरेश जुनघरे (४८) असे आरोपीचे नाव असून, तो धम्मदीपनगर झोपडपट्टी येथील रहिवासी आहे. २४ मे २०१४ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास आरोपीने सुखदेव रामटेके (५०) व त्याची पत्नी शांता (४०) यांना जुन्या भांडणावरून सब्बलने मारले होते. आरोपीला २६ मे रोजी अटक करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक आर. ए. पुरी यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात शासनातर्फे अॅड. गिरीश दुबे यांनी बाजू मांडली.
नागपुरात सब्बल मारणाऱ्याला सहा वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 22:57 IST
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सब्बल मारून दाम्पत्यास गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने गुरुवारी सहा वर्षांचा कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. सी. मुनघाटे यांनी हा निर्णय दिला. ही घटना यशोधरानगर येथे घडली होती.सुरेश जुनघरे (४८) असे ...
नागपुरात सब्बल मारणाऱ्याला सहा वर्षांचा कारावास
ठळक मुद्देसत्र न्यायालय : यशोधरानगरमधील घटना