शहरं
Join us  
Trending Stories
1
कतरने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
3
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
4
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
5
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
6
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
7
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
8
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
9
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
10
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
11
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
12
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
13
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
14
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
15
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
16
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
17
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
18
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
19
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
20
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर

नागपुरात जय जवान जय किसानतर्फे कचरा उठाओ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 21:04 IST

शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे जय जवान जय किसान संघटनेच्यावतीने गुरुवारी कचरा उठाओ आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांना निवेदन : महापालिका कार्यालयात कचरा टाकण्याचा इशारा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे जय जवान जय किसान संघटनेच्यावतीने गुरुवारी कचरा उठाओ आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर संघटनेचे पदाधिकारी कचऱ्याने भरलेला ट्रक घेऊन महापालिका कार्यालयावर धडकले. महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करून शहर कचरामुक्त करण्याची मागणी करण्यात आली. दोन दिवसात शहर कचरामुक्त न झाल्यास महापालिका कार्यालयात कचरा आणून टाकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.जय जवान जय किसान संघटनेने बजाजनगर चौकातून कचरा उठाओ आंदोलनाला सुरुवात केली. बजाजनगर चौकाच्या शेजारीच पडून असलेला कचºयाचा ढीग जेसीबीच्या साहाय्याने ट्रकमध्ये भरण्यात आला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘नागपूर महानगरपालिका मुर्दाबाद’, ‘महापौर होश मे आओ’ अशा घोषणा दिल्या. बजाजनगर चौकातील कचरा उचलल्यानंतर व्हीएनआयटी रोडवरील कुजलेला कचरा उचलण्यात आला. त्यानंतर संघटनेचे पदाधिकारी महापालिका कार्यालयावर धडकले. संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महापालिकेचे गटनेते दुनेश्वर पेठे, अरुण वनकर यांनी दोन दिवसात शहर कचरामुक्त न झाल्यास महापालिका मुख्यालयासमोर कचरा आणून टाकण्याचा इशारा दिला. त्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आयुक्तांनी दोन दिवस कामगारांचे आंदोलन असल्यामुळे कचरा उचलल्या गेला नसल्याचे मान्य केले. लवकरच शहरातील कचरा उचलून शहर कचरामुक्त करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. बीव्हीजी कंपनी झाडे लावण्याच्या करारात काळ्या यादीत गेली असताना या कंपनीशी करार कसा केला असा प्रश्न संघटनेच्या पदाधिकाºयांनी उपस्थित केला. त्यावर बीव्हीजी कंपनीविरुद्ध पुरावे सादर केल्यास करार रद्द करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. आंदोलनात जय जवान, जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, दुनेश्वर पेठे, अरुण वनकर, मिलिंद महादेवकर, प्रशांत नगरारे, रवींद्र इटकेलवार, रिझवान शेख, ऋषिकेश जाधव, अविनाश शेरेकर, रुद्र धाकडे, मनिषा ठाकरे, प्रमोद शेंडे, प्रवीण गुंजाळ, इर्शाद शेख, मंगेश सुरावार, दीपक दासरवार, आशिष पाटील सहभागी झाले होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नagitationआंदोलन