जॅकी ताब्यात; नातेवाईक, मित्रांकडे पोलिसांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 02:46 PM2017-11-24T14:46:56+5:302017-11-24T14:59:52+5:30

लॉटरी व्यावसायिक राहुल सुरेश आग्रेकर (वय ३२) याचे अपहरण करून हत्या करणाऱ्या  आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची २० पथके कार्यरत आहेत. याचपैकी एका पथकाने गुन्ह्यात वापरलेली बोलेरो बुधवारी रात्री जप्त केली. ही बोलेरो घेऊन मध्य प्रदेशातून नागपुरात आलेल्या जॅकी नामक आरोपीच्या एका साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

Jackie is In possession of police; Relatives and friends have being interogatted | जॅकी ताब्यात; नातेवाईक, मित्रांकडे पोलिसांची चौकशी

जॅकी ताब्यात; नातेवाईक, मित्रांकडे पोलिसांची चौकशी

Next
ठळक मुद्देबोलेरो जप्त २० पोलीस पथकांकडून शोध मोहीम  हत्या केल्यानंतर केले खंडणीसाठी फोन

आॅनलाईन लोकमत
नागपूर : लॉटरी व्यावसायिक राहुल सुरेश आग्रेकर (वय ३२) याचे अपहरण करून हत्या करणाऱ्या  आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची २० पथके कार्यरत आहेत. याचपैकी एका पथकाने गुन्ह्यात वापरलेली बोलेरो बुधवारी रात्री जप्त केली. ही बोलेरो घेऊन मध्य प्रदेशातून नागपुरात आलेल्या जॅकी नामक आरोपीच्या एका साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्य आरोपी मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. जॅकीच्या माध्यमातून पोलीस दुर्गेश बोकडे, पंकज हारोडे आणि मनीष नामक आरोपीचा शोध घेत आहेत.
मंगळवारी २१ नोव्हेंबरच्या सकाळी ८.३० च्या सुमारास दुर्गेश बोकडे आणि पंकज हारोडे तसेच त्यांच्या साथीदारांनी राहुलचे त्याच्या घराजवळून अपहरण केले. त्याला आपल्या बोलेरोत बसविल्यानंतर आरोपी बुटीबोरीमार्गे रामा डॅम जवळ घेऊन गेले. तेथे त्याच्यावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळल्यानंतर आरोपींनी त्याच्याच मोबाईलवरून राहुलचा भाऊ जयेशच्या मोबाईलवर फोन केला आणि अपहरणाची माहिती सांगून एक कोटीच्या खंडणीची मागणी केली. ते एकून हादरलेल्या आग्रेकर कुटुंबीयांनी आरोपींची आर्जव केली.
राहुलच्या जीविताला काही होऊ नये म्हणून आग्रेकर कुटुंबीयांनी ४० लाख रुपये जमवले असून, उर्वरित रक्कम जमवतो, तुम्ही राहुलला काही करू नका, अशी विनवणी केली. दरम्यान, ही माहिती दुपारी ४ च्या सुमारास लकडगंज ठाण्यात कळविण्यात आली. अपहरण आणि एक कोटीच्या खंडणीचे प्रकरण असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लकडगंज तसेच या परिमंडळातील सर्व पोलीस ठाण्यातील तपास पथके आरोपीच्या मागावर लावली. गुन्हे शाखेच्याही पथकाने शोधाशोध सुरू केली. सर्वात आधी या प्रकरणात आरोपी दुर्गेश बोकडेचे नाव पुढे आले. पोलिसांनी त्याच्या मोबाईलवरून आरोपींचा छडा लावण्यासाठी धावपळ सुरू केली. प्रारंभी कोराडी परिसरात आणि उशिरा रात्री आरोपी खापा, सावनेरकडे असल्याचे कळताच तिकडेही शोधाशोध सुरू झाली. मात्र, पोलिसांच्या हाती आरोपी लागले नाही. दरम्यान, पेटीचुहा गावाजवळच्या रामा डॅमजवळ एका तरुणाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला. बुटीबोरी पोलिसांनी लकडगंज ठाण्यात कळविले. घटनास्थळी सापडलेल्या काही वस्तूही दाखविल्या. त्यावरून तो मृतदेह राहुलचाच असल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे बुधवारी दुपारपासून गुन्हेशाखेची १० पैकी ८ पथके, लकडगंजची चार ते पाच पथके आणि परिमंडळ ३ मधील अर्धा डझन पथके आरोपी दुर्गेश बोकडे, पंकज हारोडे आणि त्यांच्या साथीदारांचा शोध घेऊ लागली. त्यासाठी दुर्गेश पंकज आणि मनीष नामक संशयितांचे नातेवाईक तसेच मित्रांचीही पोलीस चौकशी करीत आहेत.

पंकजने आणली बोलेरो
४या प्रकरणाचा सूत्रधार मानला जाणारा आरोपी दुर्गेश बोकडे याचे राणी दुर्गावती चौकात दुर्गेश लॉटरी सेंटर नामक दुकान आहे. त्याला व्यवसायासाठी राहुलनेच मदत केली होती. त्याला आॅनलाईन नेटवर्कच नव्हे तर ५ ते ८ संगणकही उपलब्ध करून दिले होते. दुर्गेशच्या लॉटरी सेंटरमध्ये त्याचा भाऊ सुभाष बोकडेही बसत होता. सूत्रांच्या माहितीनुसार, सुभाषने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी २१ नोव्हेंबरला सकाळी ८ च्या सुमारास दुर्गेश त्याच्या घरून दुचाकीने लॉटरी सेंटरवर पोहचला. तेथे आरोपी पंकज हारोडे आधीच बोलेरो घेऊन होता. तो मागच्या सीटवर बसला होता. ड्रायव्हींग सिटवर दुसराच कुणी होता. दुर्गेशने आपल्या दुकानाची चावी बाजूच्या पानटपरीवाल्याला दिली. ही चावी सुभाषला देशील असे सांगून, तो बोलेरोत पंकजच्या बाजूला बसला अन् ते निघून गेले. ते थेट राहुलच्या घराजवळ आले आणि त्यांनी राहुलचे अपहरण करून बुटीबोरीजवळ त्याची हत्या केली. तेथून ते मध्य प्रदेशात पळून गेले. यानंतर आरोपी राहुलच्याच फोनवरून जयेशला फोन करून खंडणीची मागणी करू लागले. राहुलची हत्या केल्यानंतर तो जिवंत आहे. तुम्ही खंडणीची रक्कम द्या, असे आरोपी जयेशला सांगत होते.

आरोपी झारखंडकडे पळाले?
४जॅकीची विचारपूस सूरू असतानाच आरोपी झारखंडकडे पळाल्याची माहिती पुढे आली आहे. दुसरीकडे मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी रात्री आरोपीच्या एका निकटवर्तीयालाही पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलीस ज्या पद्धतीने तपास करीत आहेत, त्यातून नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. त्यानुसार अपहरणाच्या काही वेळेपूर्वी ८.१५ वाजता राहुलच्या मोबाईलवर मनीष नामक तरुणाचा फोन आला होता. त्यानंतर मनीषसह सर्व आरोपी आणि राहुलच्या मोबाईल लोकेशननुसार सकाळी ९.३० ते दुपारी २ पर्यंत ते बुटीबोरी परिसरात होते. तत्पूर्वी ११.३० ला राहुलची त्याच्या पत्नीसोबत बोलणे झाले होते. त्यामुळे दुपारी १२ ते २ या कालावधीत आरोपींनी राहुलची हत्या केल्याचा अंदाज पुढे आला आहे. दुपारी ४.३० वाजता राहुलच्या मोबाईलचे लोकेशन सिल्लेवाडा भागात दिसते. सिल्लेवाडा आणि बुटीबोरीचे अंतर ५० किलोमीटर आहे. रात्री ७ वाजताचे लोकेशन पारशिवनीतील आहे. त्यानंतर राहुलचा फोन बंद झाला. याचदरम्यान आरोपींनी येथील एका निकटवर्तीयासोबत बोलणी केली. तो आरोपींना येथील घडामोडींची माहिती देत असावा, असा संशय आहे. या प्रकरणात लॉटरी व्यवसायातील स्पर्धा आहे काय, त्याचाही पोलीस शोध घेत आहेत. त्यामुळेच तीन बड्या लॉटरी व्यावसायिकांकडेही पोलिसांची नजर लागली आहे. त्यांच्या हालचाली टिपल्या जात आहेत. गरज पडल्यास त्यांनाही पोलीस चौकशीसाठी बोलवू शकतात, असे सूत्रांचे सांगणे आहे.

Web Title: Jackie is In possession of police; Relatives and friends have being interogatted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून