शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

असा मुलगा मिळणे माझे भाग्यच !!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 21:36 IST

दोन वर्षांपासून वडील अर्धांगवायूच्या धक्क्याने ग्रस्त. त्यामुळे आर्थिक बाजूही कमकुवतच. अशात वडिलांची काळजी, घरात आईला मदत, घरात असल्या नसल्याची तडजोड करून अभ्यासात कधीही खंड पडू दिला नाही. आज तो पहिला आलाय, याचा अतिशय आनंद होत आहे. मला शब्दच सुचत नाही. पण एक आई म्हणून असा मुलगा मिळणे माझे भाग्यच आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया आदित्यची आई मंजू डोकवाल यांनी दिली.

ठळक मुद्देबारावीत विदर्भातून पहिला आलेल्या आदित्यच्या आईची भावनिक प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन वर्षांपासून वडील अर्धांगवायूच्या धक्क्याने ग्रस्त. त्यामुळे आर्थिक बाजूही कमकुवतच. अशात वडिलांची काळजी, घरात आईला मदत, घरात असल्या नसल्याची तडजोड करून अभ्यासात कधीही खंड पडू दिला नाही. आज तो पहिला आलाय, याचा अतिशय आनंद होत आहे. मला शब्दच सुचत नाही. पण एक आई म्हणून असा मुलगा मिळणे माझे भाग्यच आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया आदित्यची आई मंजू डोकवाल यांनी दिली.डॉ. आंबेडकर कॉलेजचा विद्यार्थी आदित्य सुरेंद्रकुमार डोकवाल याने बारावीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण मिळविले आहे. आदित्यने मिळविलेल्या गुणांमुळे त्याने प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तसा आदित्य मुळातच हुशार, दहावीतसुद्धा त्याने ९८ टक्के गुण घेतले होते. मुलगा हुशार असल्याने त्याच्या कुटुंबाने पुढच्या शिक्षणासाठी वर्धा सोडून नागपूर गाठले. याच दरम्यान त्याच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. आदित्य घरात एकटाच असल्याने घरातील सर्व जबाबदारी त्याच्यावर आली. पण त्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. कुठल्याच गोष्टीचा घरात कधी हट्ट केला नाही. सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असणाऱ्या आजच्या मुलांमध्ये आदित्य अपवाद आहे. आपल्या यशाबद्दल बोलताना आदित्य म्हणाला की, जबाबदारी ही सर्वकाही शिकवून जाते.न्यूरो सर्जन व्हायचे आहेआदित्यचे बालपणापासूनचे स्वप्न डॉक्टर बनण्याचे होते. त्या दृष्टिकोनातून त्याचे प्रयत्नही सुरू आहेत. नीटची परीक्षा त्याने दिली आहे. वडिलांचे आजारपण हे त्याला आणखी जास्त वैद्यकीय क्षेत्राचे वेध लावून गेले. ज्या डॉक्टरांकडून त्याच्या वडिलांवर उपचार सुरू आहेत, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आदित्यनेसुद्धा न्यूरो सर्जन बनण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८nagpurनागपूर