शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हे दोन महिने कुटुंबापासून विरहवेदनेचे ! जालंधर ते नागपूर प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 11:22 IST

जालंधर येथील आंतरराष्ट्रीय लवली युनिव्हर्सिटीमध्ये नाट्यशिक्षक असलेले युवा रंगकर्मी प्रा. गौरव अंबारे कोरोनाच्या सावटात तेथेच अडकले आणि तब्बल आठ महिन्यानंतर नागपूरला परतले आहेत. त्यांनी या प्रवासाचा थरारक अनुभव ‘लोकमत’कडे व्यक्त केला.

ठळक मुद्देभयाचा, संशयाचा अन् चिकित्सेचा, स्वत:ला केले ‘होम क्वारंटाईन’

प्रवीण खापरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ध्येयविहीन परिस्थिती निर्माण झाली तर माणूस सर्वार्थाने एकटा पडतो आणि कुटुंबीयांच्या आठवणींचा कळवळा सुटतो. अशा तळमळीने ग्रासलेल्या मजुरांचे थवे दिसत आहेतच. कोरोनामुळे मानवाच्या मनस्थितीची अशीच दशा थोड्याफार फरकाने दिसून येत आहे. जालंधर येथील आंतरराष्ट्रीय लवली युनिव्हर्सिटीमध्ये नाट्यशिक्षक असलेले युवा रंगकर्मी प्रा. गौरव अंबारे कोरोनाच्या सावटात तेथेच अडकले आणि तब्बल आठ महिन्यानंतर नागपूरला परतले आहेत. त्यांनी या प्रवासाचा थरारक अनुभव ‘लोकमत’कडे व्यक्त केला.शैक्षणिक सत्र आटोपण्यापूर्वीच कोरोनामुळे संपूर्ण देश टाळेबंदीत आला. युनिव्हर्सिटीलाही हा काळ जाईपर्यंत टाळे बसले आणि गौरव विद्यापीठाच्या वसतिगृहात एकलेच बंदिस्त झाले. अशा स्थितीत नागपूरला जाण्याची संधी मिळाली होती. मात्र, आसामचा एक सहकारी प्राध्यापक एकटा पडेल म्हणून ती संधी गौरव यांनी गमावली. त्याच्या राज्यातून त्याला बोलावणे आल्यावर गौरव यांनी पंजाब सरकारला नागपूरला जाण्याच्या व्यवस्थेचे पत्र पाठवले आणि त्या अनुषंगाने सरकारी आरोग्य पथकाकडून त्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी झाली. दहा-बारा दिवसानंतर नागपूरच्या प्रवासाचा मुहूर्त ठरला आणि हा प्रवास अत्यंत भयाचा, संशयाचा, चिकित्सेचा आणि तेवढाच उत्सुकतेचा होता, हे आज नागपुरात उतरल्यानंतर गौरव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ट्रान्सपोर्ट यंत्रणा अर्थात बसस्थानक, रेल्वे, विमानतळ हे सदैव माणसाच्या धावपळीने फुलले असते. मात्र, २७ मे रोजी जेव्हा ते जालंधर बसस्थानकावर पोहोचले तेव्हा बसथानकावर कमालीची स्मशान शांतता दिसली. तेथून दुपारी अमृतसर विमानतळावर पोहोचलो तेव्हा विमानतळ जणू हॉस्पिटलमध्ये परावर्तित झाल्याचा भास झाला. फॉर्म भरून देणे, सॅनिटाईझ करणे, मास्क देणे आणि फ्लाईटचा वेळ होईपर्यंत एकटे बसून राहणे ही प्रक्रिया विमानतळावर होती. रात्री अमृतसरहून दिल्ली विमानतळावर उतरलो तर आणखीनच कठीण प्रक्रिया सुरू झाल्या आणि एवढे मोठ्ठे विमानतळ एखाद्या भयपटाला शोभेल अशा स्थितीत दिसून आले. जो-तो पीपीई किटमध्ये होता आणि दर अर्ध्या तासाने स्क्रिनिंग व चाचपणी होत होती. साधारण ७ तास दिल्ली विमानतळावर घालविल्यानंतर २८ मे रोजी सकाळी ६.३०च्या फ्लाईटमध्ये बसलो तेव्हा जीवात जीव आला आणि ८ वाजता नागपूर विमानतळावर पोहोचल्यानंतर पुन्हा फॉर्म भरून द्यावा लागला आणि हातावर ११ जूनपर्यंत ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का बसला. सोबतच शंभर नंबरवर पोलिसांना माहिती दिल्यानंतर घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यावर तब्बल आठ महिन्यानंतर आई व इतरांचे दर्शन झाले. केवळ मुखदर्शन घेऊन वरचा मजला गाठला आणि आता पुढचे १४ दिवस त्याच एका खोलीत राहायचे आहे, असे गौरव यांनी सांगितले.१४ दिवसानंतर आईला करकचून मिठी मारीन : गौरव अंबारेतब्बल आठ महिन्यानंतर आई दिसली. मात्र, सगळ्यांचे आरोग्य महत्त्वाचे. होम क्वारंटाईनचा काळ गेल्यावर तिला करकचून मिठी मारणार आहे. या दोन महिन्याच्या काळात करायला काहीच नव्हते. पुस्तकांचे वाचन आणि घरच्यांची आठवण, हाच विषय होता. दरम्यान, एका आॅनलाईन वेबसिरिजमध्ये काम केले. त्यात सगळेच नागपूरचे असल्याने नागपूरला कधी पोहोचतो असे झाले होते, अशी भावना गौरव अंबारे यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस