शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जमीन अधिग्रहणानंतरच इतवारी-नागभीड ब्रॉडगेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 22:15 IST

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थाक सुनील सिंह सोईन यांनी आज गोंदिया-इतवारी सेक्शनचा वार्षिक पाहणी दौरा केला. दौऱ्यात त्यांनी जमीन अधिग्रहण झाल्यानंतर इतवारी-नागभीड ब्रॉडगेजचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देसुनील सोईन : इतवारी-गोंदिया सेक्शनचा वार्षिक निरीक्षण दौरा

आॅनलाईन लोकमतनागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थाक सुनील सिंह सोईन यांनी आज गोंदिया-इतवारी सेक्शनचा वार्षिक पाहणी दौरा केला. दौऱ्यात त्यांनी जमीन अधिग्रहण झाल्यानंतर इतवारी-नागभीड ब्रॉडगेजचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. जबलपूर-गोंदिया व छिंदवाडा-नागपूर दरम्यान ब्रॉडगेज लाईन तयार झाल्यानंतर इतवारी रेल्वेस्थानकाचा विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाव्यवस्थापकांनी विभागातील रेल्वेस्थानकांची चांगली देखभाल केल्याबद्दल एक लाख रुपयांचे पारितोषिक आणि ग्रुप अवॉर्ड देण्याचे जाहीर केले.वार्षिक पाहणी दौऱ्यादरम्यान महाव्यवस्थापक सुनील सिंह सोईन यांनी कोचेवानी, मुंडीकोटा-तुमसर दरम्यानचा पूल, तुमसर रेल्वेस्थानक, वैनगंगा पूल, रेल्वे कॉलनी, हेल्थ युनिट, आरपीएफ पोस्ट, भंडारा रेल्वेस्थानक, रेल्वेगेटचे निरीक्षण केले. भंडारा रेल्वेस्थानकावर खाद्यपदार्थांच्या युनिटमध्ये त्यांनी नाश्ता घेऊन खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासली. त्यानंतर ते इतवारी रेल्वेस्थानकावर पोहोचले. येथे अ‍ॅक्सिडेंट रिलीफ ट्रेन, अ‍ॅक्सिडेंट रिलीफ मेडिकल इक्विपमेंट ट्रेन, गार्ड लॉबी, ब्रेल लिपी सुविधा आणि इतर प्रवासी सुविधांचे निरीक्षण केले. यावेळी त्यांनी प्रवासी सुविधा आणि सुरक्षा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर महाव्यवस्थापक सोईन मोतीबाग येथील नॅरोगेज रेल्वे संग्रहालयात गेले. येथे त्यांनी नैनपूर येथे तयार करण्यात आलेल्या रेल्वे संग्रहालयात स्थापन करण्यात आलेल्या रेल्वेच्या ऐतिहासिक बाबींच्या माहितीसाठी तयार करण्यात आलेल्या ‘कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन केले. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमित कुमार अग्रवाल आणि अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीnagpurनागपूर