शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

योग्य व्यायाम, आहार व डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे खेळातील गुणवत्ता वाढविणे शक्य; डॉ. सतीश सोनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 18:05 IST

खेळांमधून होणाऱ्या दुखापती पूर्णपणे टाळणे खेळाडूंना कधीच शक्य नसते. पण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास दुखापत गंभीर होण्यास टाळता येते, अशी माहिती प्रसिद्ध अस्थिव्यंग शल्यचिकित्सक डॉ. सतीश सोनार यांनी दिली.

ठळक मुद्देखेळांडूनी दुखापतीकडे दुर्लक्ष करू नये

आॅनलाईन लोकमतनागपूर : अनेक क्रिकेट, बॅडमिंटन व टेनिसपटूंना खांद्याच्या तर फुटबॉल खेळाडूंना हमखास ‘अँकल’ दुखापतीला सामोरे जावे लागते. खेळाडूंना होणाऱ्या दुखापतींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खेळांमधून होणाऱ्या दुखापती पूर्णपणे टाळणे खेळाडूंना कधीच शक्य नसते. पण, योग्य ती काळजी घेतल्यास, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास दुखापत गंभीर होण्यास टाळता येते, अशी माहिती प्रसिद्ध अस्थिव्यंग शल्यचिकित्सक डॉ. सतीश सोनार यांनी दिली.शारीरिक क्षमता लक्षात घेऊनच खेळ निवडाहल्ली असे दिसून येते की कित्येक मुलांच्या पालकांना आपला मुलगा खेळाडू व्हावा असे वाटते आणि त्या दृष्टीने ते आपल्या मुलाला घडविण्याचा प्रयत्नही करतात. ही एक चांगली बाब असली तरी अनेक खेळाडूंना आवश्यक पायाभूत सोई मिळत नाही. यातच आपली क्षमता व शारीरिक ठेवण लक्षात न घेता कुठलाही खेळ खेळत असल्याने गुणवत्ता असूनही विविध दुखापती घेऊन बसतात. आपली शारीरिक क्षमता व गुणवत्ता लक्षात घेऊनच खेळ निवडावा, असा सल्ला डॉ. सोनार यांनी दिला.खेळ खेळण्यापूर्वी २० मिनिटे व्यायाम आवश्यकप्रत्येक खेळाडूने कुठलाही खेळ खेळण्यापूर्वी साधारण २० ते २५ मिनिटे व्यायाम करायला हवा. स्नायू ताणतील असा व्यायामाचा प्रकार असावा. यामुळे खेळताना दुखापतीचे प्रमाण कमी होईल. सोबतच खेळून झाल्यावर तेवढीच मिनिटे ‘कुल डाऊन’ व्हायला हवे. यात हलके स्नायूला ताण देण्याचा व्यायाम व थोडी विश्रांती घ्यायला हवी.आहार महत्त्वाचाडॉ. सोनार म्हणाले, खेळाडूंनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मसाले, तळलेले व गोड पदार्थ टाळावे किंवा कमी करावे. दूध व दुग्धजन्य पदार्थांचा वापर वाढवायला हवा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ‘नॉन व्हेज’चाही आहारात समावेश करावा. कारण, कुठल्याही खेळासाठी स्नायू मजबूत असणे आवश्यक आहे.खेळाप्रमाणे ‘अप्पर’ व ‘लोवर बॉडी मसल्स’कडे लक्ष द्यावेबॅडमिंटन, टेनिस, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल या खेळाडूंची ‘अप्पर बॉडी मसल्स’ मजबूत असायला हवी. तर ‘लोवर बॉडी मसल्स’मध्ये चपळता असण्यासाठी त्या दृष्टीने स्नायू असायला हवे. या उलट फुटबॉल, हॉकीसारख्या खेळांमध्ये खेळाडूची ‘लोवर बॉडी मसल्स’ म्हणजे पायाचे स्नायू दणकट असायला हवे तर ‘अप्पर बॉडी मसल्स’मध्ये चपळता असायला हवी. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असेही डॉ. सोनार म्हणाले.खेळाडूंनी ‘हॉट मसाज’ टाळावाखेळाडूला दुखापत झाल्यास त्यावर ‘हॉट मसाज’ करू नये. कारण दुखपतीची जागा आधीच ‘हॉट’ असते त्यात ही ‘मसाज’ गंभीरता वाढविते. याऐवजी १५ ते २० मिनिटे ‘आईस मसाज’ करावा. नंतर वेदनाक्षमक स्प्रेचा वापर करून स्क्रॅप बॅण्डेज बांधावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावा.दुखापत गंभीर होऊ नयेकोणताही खेळ खेळताना खेळाडू सर्वस्व पणाला लावून खेळत असतो. अशावेळी त्याच्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो. खेळताना या खेळाडूंना दुखापती होणेही साहजिक असते. परंतु काही खेळाडू दुखापत सांगितल्यास खेळातून काढून टाकतील या भीतीने दुखापत लपवितात. परंतु असे करणे म्हणजे, स्वत:ची दुखापत वाढविण्यासारखेच असते. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास दुखापत लवकर भरून निघते, शस्त्रक्रिया टाळता येते.आॅर्थाेस्कोपी शस्त्रक्रिया खेळाडूंसाठी वरदानपूर्वी कुठल्याही खेळाडूला मोठी दुखापत झाल्यास व त्यावर शस्त्रक्रिया झाल्यास पुढे तो खेळू शकेल किंवा नाही यावर संशय व्यक्त व्हायचा, परंतु आता ‘आॅर्थाेस्कोपी’ म्हणजे दुर्बिणद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे कमीत कमी चिरा लागून अचूक शस्त्रक्रिया होत असल्याने खेळाडू पुन्हा खेळण्याची शक्यता वाढते. ही शस्त्रक्रिया खेळाडूंसाठी वरदान ठरत आहे. शस्त्रक्रिया एवढेच महत्त्व फिजिओथेरपीचे आहे. यामुळे शस्त्रक्रिया झालेल्या खेळाडूंनी फिजिओथेरपीला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे.अपघातानंतरचे दुखणे अंगावर काढू नकाडॉ. सोनार म्हणाले, सध्या दुचाकी चालकांच्या अपघातांची संख्या वाढली आहे. यात पाय मुरगळणे, खांद्याचा पडदा फाटणे ही समस्या दिसून येते. या दुखापतीमुळे सुरुवातीला सूज येते व नंतर ती बरीही होते. परंतु दोन-तीन महिन्यांनंतरही चालताना किंवा पायºया चढताना त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

रस्त्यावर, सिमेंटच्या फ्लोअरवर धावू नयेअनेक खेळाडू किंवा सामान्य व्यक्ती रस्त्यावर किंवा सिमेंटच्या फ्लोअरवर धावतात. परंतु असे केल्याने गुडघा व पाठीच्या स्नायूंना झटके बसतात. भविष्यात गुडघा किंवा पाठीचे दुखणे वाढण्याची शक्यता असते. म्हणून मैदानावर धावावे. ४०-४५ वर्षांवरील व्यक्तींनी धावण्यापेक्षा पायी चालणे योग्य आहे. धावण्यासाठी किंवा मॉर्निग वॉक करण्यासाठी धावण्याचेच शूज वापरावे व कॉटनचे कपडे वापरावे.

 

 

टॅग्स :Sportsक्रीडा