शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

आपल्या प्रगल्भतेनेच कोरोनाचा पराभव शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 21:09 IST

सरकारच्या दिशा-निर्देशांचे पालन करू तरच कोरोनाचा पराभव होईल आणि भारत सुरक्षित राहील.

ठळक मुद्देसोशल डिस्टेन्सिंग होम क्वॉरंटाईनचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून देशाला मुक्त करण्याच्या कार्यात आपणा सगळ्यांचीच भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. लॉकडाऊनच्या काळात स्वत:ला होम क्वॉरंटाईन करत, सोशल डिस्टेन्सिंग पाळत प्रत्येकालाच देशहिताचे कर्तव्य पार पाडावे लागणार आहे. सरकारच्या दिशा-निर्देशांचे पालन करू तरच कोरोनाचा पराभव होईल आणि भारत सुरक्षित राहील. लॉकडाऊनच्या काळात घराच्या बाहेर निघणाऱ्या व सोशल डिस्टेन्सिंग न पाळणाºया मुस्लिम समाजाला जबाबदार नागरिकांनी समजदारी दाखविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.लॉकडाऊन पाळा आणि प्रशासनाला सहकार्य करा: प्रशासनाच्या इशाऱ्याकडे काही लोक दुर्लक्ष करत आहेत आणि लॉकडाऊनचे उल्लंघन करत आहेत. यामुळे आपलेच नुकसान आहे. यामुळे आपण आपल्या कुटुंबाला आणि देशाला संकटात टाकतो आहोत. आपल्या निष्काळजीपणाची शिक्षा संपूर्ण देशाला भोगावी लागेल. सोशल डिस्टेन्सिंग पाळल्याने कोरोनाशी लढता येईल. आपण आपले व्यवसाय पुन्हा एकदा सुरू करू शकतो. त्यामुळे सर्वांनीच भारताला कोरोनामुक्त करण्यासाठी लॉकडाऊनचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मौलाना सैयद आलमगीर अशरफ यांनी केले आहे.सरकारच्या दिशानिर्देशाचे पालन करा : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने विश्व स्वास्थ्य संघटनेच्या मार्गदर्शिकेनुसार योग्य पाऊले उचलली आहेत. त्याअनुसार सोशल डिस्टेन्सिंग जपणे, मास्क, सॅनिटायझरचा उपयोग करणे आणि होम क्वॉरंटाईनमध्ये राहणे गरजेचे आहे. आपण कुटूंबीयांसोबत घरीच राहून या संकटाला निस्तारण्यास सरकारला सहकार्य करू शकतो. कोरोनाला रोखण्यासाठी हे अत्यंत गरजेचे असल्याचे नागपूर मरकजचे सचिव हाजी अब्दुल बारी पटेल यांनी म्हटले आहे.पैगंबरांनीही म्हटले होते घरी राहा : मोहम्मद पैगंबरांनीही अशा प्रकारच्या महामारीच्या काळात घरी राहण्याचे आवाहन केले होते. याचा उल्लेख हदीसे नबवीमध्ये आलेला आहे. अशाच प्रकारची महामारी त्यांच्या काळातही आली होती. त्यावेळी त्यांनी नागरिकांना घरी राहून एकदुसऱ्याशी दूर राहण्याची सूचना केली होती. ज्या प्रमाणे वाघ पुढे येताच आपण त्यापासू दूर पळतो. त्याच प्रमाणे ही महामारी आहे. म्हणूनच सोशल डिस्टेन्सिंग पाळून कुटूंबाला व देशाला सुरक्षित ठेवण्याचे आवाहन शिक्षणतज्ज्ञ जफर अहमद खान यांनी केले आहे.कोरोनाला हरविण्याची जबाबदारी आपलीच :आपल्या निष्काळजीपणामुळेच कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. या वैश्विक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने बाहेर निघण्यास मनाई केले आहे. याच प्रक्रीयेने कोरोनाला हरविता येणारआहे. आपल्याच समजदारीने भारत कोरोनामुक्त होईल. लॉकडाऊन आपल्या हिताचे असल्याची भावना मस्जिद अन्सार कमेटीचे अध्यक्ष हाजी मो. अलीमुद्दीन यांनी व्यक्त केली आहे.होम क्वॉरंटाईन गरजेचे : सरकारने सगळ्यांच्याच फायद्यासाठी नियमावली तयार केली आहे आणि उपाययोजना सादर केल्या आहेत. सरकारच्या आदेशाचे पालन करत प्रत्येकाने स्वत:ला घरामध्ये क्वॉरंटाईन करणे गरजेचे आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. ही चिंतेची बाब असून, यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर सरकार व प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे असल्याचे समाजसेवक अफजल फारुख यांनी म्हटले आहे.कोरोना विरूद्ध आपल्याला लढायचे आहे : सरकारने जबाबदारीने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे आणि स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. सरकारचे हे पाऊल पूर्णपणे जनहित, देशहिताचे आहे. आपण या नियमांचे पालन करणार नाही तर स्थिती बिकट होईल. त्यामुळे घरी राहून सोशल डिस्टेन्सिंगचे पालन करावेच लागेल असे आवाहन मरकजी सिरतुन्नबी कमेटीचे अध्यक्ष परवेज रिजवी यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस