शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

संस्काराचे बीज समाजात रुजविणे गरजेचे आहे : गिरीश गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 21:14 IST

७० वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही व्यसनमुक्ती केंद्र, दारुबंदीचे लढे पुकारावे लागत आहे. त्यामुळे समाजात संस्काराचे बीज रुजविणे गरजेचे असल्याचे मत वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसी.मो. झाडे फाऊंडेशनचा पुरस्कार वितरण सोहळा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ७० वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही व्यसनमुक्ती केंद्र, दारुबंदीचे लढे पुकारावे लागत आहे. कारण सामाजिक वातावरणच गढूळ झाले आहे. दारुच्या नावावर राजकारण्यांना दोष देऊन चालणार नाही, याला समाजातील प्रत्येक घटकच जबाबदार आहे. त्यामुळे समाजात संस्काराचे बीज रुजविणे गरजेचे असल्याचे मत वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी व्यक्त केले.सी.मो. झाडे फाऊंडेशन तर्फे विशेष कार्य पुरस्काराचे वितरण बुधवारी दाभा येथील श्री सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रात झाले. तसेच या केंद्राच्या वातानुकूलीत वास्तुचे उद्घाटन गिरीश गांधी यांच्याहस्ते झाले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी, शुभदा देशमुख तसेच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सर्वोदयी विचारवंत अ‍ॅड. मा.म. गडकरी व सी.मो. झाडे फाऊंडेशनच्या सचिव भारती झाडे उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी म्हणाल्या की, दारुबंदी, व्यसनमुक्ती बरोबरच आता अस्तीत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने २०१९ हे वर्ष सरताना एनआरसी, सीएए सारखे कायदे करून लोकांना अस्तित्व सिद्ध करण्यासाठी नोटाबंदीमध्ये जसे रांगेत लागले, तसे रांगेत लागावे लागणार आहे. आज आदिवासी, भटके विमुक्तांजवळ आपले अस्तीत्व असल्याचे १९७१ पुर्वीचे दाखल मिळणे शक्य नाही. त्यामुळे हे कायदे दारुबंदी, व्यसनमुक्ती पेक्षा जास्त घातक आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी सी.मो. झाडे फाऊंडेशनतर्फे डॉ. गोविंद समर्थ दिव्यांग सेवा कार्य पुरस्कार छबन अंजनकर, मीराबेन शाह सामाजिक कार्य पुरस्कार लता राजपुत, ना.बा. सपाटे आदर्श शिक्षक पुरस्कार नरेंद्र पाटील, सी.मो. झाडे पत्रकारीता पुरस्कार प्रमोद काळबांडे, डॉ. अतुल कल्लावार आरोग्य सेवा पुरस्कार डॉ. प्रमोद पोतदार यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर श्री सत्यनारायण नुवाल गुरुकुल केंद्राला मदत करणाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास झाडे यांनी केले.

टॅग्स :social workerसमाजसेवकJournalistपत्रकारGirish Gandhiगिरीश गांधी