शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

'सोलर’मध्ये हलगर्जी व निष्काळजीमुळे स्फोट झाल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 05:28 IST

स्फोटाच्या वेळी शिकाऊ सुपरवायझर अन् कामगारच होते आत

- योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सोलर इंडस्ट्रीज’मधील दुर्दैवी घटनेला ३६ तासांचा कालावधी उलटून गेल्यावरदेखील स्फोटाचे कारण कळालेले नाही. मात्र ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी केवळ शिकाऊ सुपरवायझर व कामगारच युनिटच्या आत कामाला होते असा खुलासा समोर आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून हलगर्जी व निष्काळजीमुळेच स्फोट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा स्थितीत स्फोटासाठी कुणाला नेमके जबाबदार ठरविणार की कामगारांचीच चूक असल्याचा ठपका ठेवण्यात येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सोमवारी मध्यरात्रीनंतर या प्रकरणात कोंढाळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोलर इंडस्ट्रीजमध्ये सीपीसीएच-२ युनिटमध्ये झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण परिसर अक्षरश: हादरला. या युनिटमध्ये कोळसा खाणींसाठी वापरण्यात येणारे कास्ट बुस्टर उत्पादित करण्यात येत होते. तेथे अगोदर टीएनटी व इतर कच्च्या मालाची चाळणी प्रक्रिया होते. त्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून आठ कामगार, एक शिकाऊ सुपरवायझर, दोन पॅकिंग व लोडिंग ऑपरेटर कामावर होते. सुपरवायझर पावणेनऊ वाजता लघुशंकेसाठी बाहेर गेला तर दोन्ही ऑपरेटर टीएनटीचे रिकामे बॉक्स टीएनटी रूममध्ये ठेवण्यासाठी बाहेर गेले. घटनेच्या वेळी केवळ शिकाऊ सुपरवायझर व इतर कामगार हेच टीएनटी चाळणीचे काम करत होते. नेमका त्याच वेळी अचानक स्फोट झाला व क्षणात पूर्ण इमारत पत्त्यांसाठी खाली कोसळली. हा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे तंत्रज्ञांनादेखील सांगणे शक्य झालेले नाही.

- आरोपी बनविणार तरी कुणाला ?

पोलिसांनी सद्य:स्थितीत अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, सुपरवायझरच्या बयाणानुसार हा स्फोट हलगर्जी व निष्काळजीपणामुळे झाला आहे. आता हा निष्काळजीपणा कुणी दाखविला हा मोठा प्रश्न पोलीस व इतर तपास यंत्रणांसमोर आहे. ‘क्रिमिनल लायबिलिटी’ आणि ‘सेफ्टी प्राेटाेकाॅल’ विचारात घेता या प्रकरणात सध्या भादंवि ३०४ (सदाेष मनुष्यवध) ऐवजी भादंवि ३०४ (अ), २८६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज व इतर महत्त्वाच्या बाबींची तपासणी केली जात आहे, असे पोलिस अधीक्षक हर्ष पाेद्दार यांनी स्पष्ट केले. आता पोलिस नेमके कुणाला आरोपी बनविणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Blastस्फोट