शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिने झाले, सांगा साहेब आश्वासनाचे काय झाले ? एसटी कामगार संघटनेचा सवाल

By नरेश डोंगरे | Updated: December 13, 2023 21:15 IST

कामगारांच्या पदरी नुसतीच निराशा

नागपूर: सरकारकडून केवळ आश्वासन मिळते, मागण्या पूर्ण होतच नाही. अनेक वर्षांपासून नुसती निराशाच पदरी पडत असल्याने आम्ही राज्यभरातील एसटीचे कर्मचारी निराश झालो आहे. त्यामुळे सरकारने तातडीने आमचे हक्क आमच्या पदरात घालावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने सरकारला दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सावंत यांची या अनुषंगाने मंगळवारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. पत्रकारांना या संबंधाने माहिती देताना संदीप शिंदे यांनी सांगितले की, कामगारांच्या विविध मागण्या पूर्ण व्हाव्या याकरिता एसटी कामगार संघटनेने ११ सप्टेंबरला बेमुदत उपोषणची हाक दिली होती. संपामुळे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात हे लक्षात घेऊन त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्देशावरून उद्योगमंत्री सामंत यांनी महागाई भत्ता हा ३४ टक्क्यांवरून वाढवून ४२ टक्के मंजूर केला होता. तर, इतर मागण्यांकरिता १५ दिवसांत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेसोबत बैठक घेऊन निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते.

आर्थिक मागण्यांबाबत वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून ६० दिवसांत त्यावर निर्णय घेण्यात येईल, असेही लेखी आश्वासन दिले होते. आता त्याला ३ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला, मात्र, अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे एसटी कामगारांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री शिंदे, उद्योगमंत्री सामंत आणि मंत्री दादा भुसे यांना निवेदन देण्यात आले आहे. आमच्या मागण्या तातडीने मान्य झाल्या नाही तर राज्यात तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही आम्ही दिल्याचे संदीप शिंदे यांनी सांगितले. तर, मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी लवकरच या संबंधाने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिल्याचेही शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.१७ च्या बैठकीत निर्णयथकीत असलेले ११९० कोटी रुपये, महागाई आणि घरभाडे भत्ता तसेच सातवा वेतन आयोग एसटी कामगारांना तातडीने लागू करावा, अशा आमच्या मुख्य मागण्या आहेत. सरकारने लवकर या संबंधाने निर्णय घेतला नाही तर आम्ही १७ डिसेंबरला बैठक बोलावली आहे. या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा तयार केली जाणार असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांनी म्हटले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर