शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 21:00 IST

येत्या आर्थिक वर्षात आपणास वीज ग्राहकांना अचूक देयक देण्यासोबतच मागणी वाढवायची आहे. वीज देयकाची व्यवस्था अचूकपणे अमलात आणल्यास वीज ग्राहकांना चुकीचे देयक जाणार नाहीत, ही सामूहिक जबाबदारी आहे, असे महावितरण नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सांगितले.

ठळक मुद्देप्रादेशिक संचालक खंडाईत : उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : येत्या आर्थिक वर्षात आपणास वीज ग्राहकांना अचूक देयक देण्यासोबतच मागणी वाढवायची आहे. वीज देयकाची व्यवस्था अचूकपणे अमलात आणल्यास वीज ग्राहकांना चुकीचे देयक जाणार नाहीत, ही सामूहिक जबाबदारी आहे, असे महावितरण नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सांगितले.नागपूर परिमंडळच्यावतीने २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करण्याऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करण्यात आला. महावितरणच्या बिजली नगर विश्रामगृहाच्या हिरवळीवर हा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता रफिक शेख, नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, शहर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता मनीष वाठ, वर्धा मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे, पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता उमेश शहारे, विधी सल्लागार ताराचंद लालवानी, सहायक महाव्यस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात उपस्थित होते.नागपूर परिमंडळ कार्यालयाने दररोज चार थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची योजना नोव्हेंबर-२०१७ पासून अमलात आणली याचे चांगले परिणाम मागील आर्थिक वर्षात दिसल्याचेही खंडाईत म्हणाले.यावेळी नागपूर परिमंडलातील मौदा उपविभागाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या शिवाय प्रत्येक उपविभागातील दोन जनमित्र, शहरी आणि ग्रामीण भागातील प्रत्येकी दोन विभाग, प्रत्येक उपविभातील लेखा विभागातील लिपिक, शंभर टक्के मागणी वसूल करणारे शाखा अभियंता यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय मानकर, पी.एन. गुन्नाले, उपकार्यकारी अभियंता प्रफुल वैद्य, वैभव नारखेडे, गुणसागर नाईक, प्रशांत उईके, सहायक लेखापाल कुंदन शंभरकर, अनिल पिसे, पिरूसिंग राठोड, मनीष क्षीरसागर, महेश नायडू, विलास सत्रे यांच्यासह ६७ जनमित्रांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.संचालन मधुसूदन मराठे यांनी केले तर कार्यकारी अभियंता वंदना परिहार यांनी आभार मानले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर