शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी सासरच्या घरात बळजबरीने प्रवेश करू शकत नसल्याचा निर्वाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 04:55 IST

कुटुंब न्यायालयाचा निर्णय; कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करा

- राकेश घानोडे नागपूर : कायदेशीर हक्क असला तरी पत्नी सासरच्या घरात बळजबरीने प्रवेश करू शकत नाही. त्याकरिता तिने कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करणे आवश्यक आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय कुटुंब न्यायालयाने एका प्रकरणात दिला.कुटुंब न्यायालयात घटस्फोट याचिका प्रलंबित असताना पत्नी मनात येईल तेव्हा सासरच्या घरी जात होती. सासरच्या मंडळींनी घरात प्रवेश करण्यास विरोध केल्यास ती बळजबरीने आत प्रवेश करीत होती. एवढेच नाही तर, ती स्वत:सोबत गुंड प्रवृत्तीचे लोकही आणत होती. त्यामुळे पतीने कुटुंब न्यायालयात अर्ज दाखल करून पत्नी व तिच्याशी संबंधित व्यक्तींना सासरच्या घरात प्रवेश करण्यास मनाई करण्याची विनंती केली होती. कुटुंब न्यायालयाने तो अर्ज मंजूर केला. सध्या पती-पत्नीचा विवाह कायम आहे व घटस्फोटापूर्वी पत्नीला पतीच्या घरात प्रवेश करण्यापासून थांबवता येत नाही. असे असले तरी, पत्नी ही सासरच्या घरात बळजबरीने प्रवेश करण्याचे आणि उपद्रवी कृत्य करण्याचे स्वातंत्र्य घेऊ शकत नाही. तिला कायदेशीर प्रक्रिया पायदळी तुडवून सासरच्या घरात प्रवेश करता येणार नाही, असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले.प्रेमविवाहाला तडेप्रकरणातील पती सुनील व पत्नी पूजा (बदललेली नावे) यांनी २०१३ मध्ये प्रेमविवाह केला. त्यानंतर काही महिन्यांतच त्यांचे एकमेकांशी खटके उडायला लागले. मनाविरुद्ध लग्न केल्यामुळे सुनीलला त्याच्या आई-वडिलांनी घरात प्रवेश दिला नव्हता. दरम्यान, सुनीलने पूजाला सोडण्याचा निर्णय घेऊन कुटुंब न्यायालयात घटस्फोट याचिका दाखल केली. त्यात त्याने पूजावर क्रूरतेचा आरोप केला आहे. सध्या तो पूजासोबत राहत नाही. असे असताना पूजा त्याच्या आई-वडिलांच्या घरात बळजबरीने प्रवेश करून उच्छाद मांडते, असे सुनीलचे म्हणणे होते.