शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दूषित व पाणीटंचाईच्या मुद्यावर नागपूर मनपात विरोधक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:10 IST

उन्हाच्या तडाख्यासोबतच शहराच्या विविध भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. शहरातील काही वस्त्यात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. नळांना पाणी कमी दाबाने येत आहे. मे महिन्यात पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासन व सत्तापक्षाने संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. परंतु अद्याप त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. टंचाईसोबतच दूषित पाण्याच्या मुद्यावरून विरोधक आक्र मक असल्याने शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसर्वसाधारण सभेत गाजणार एम्प्रेस मॉलचा मुद्दा : निधी वाटपातही भेदभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाच्या तडाख्यासोबतच शहराच्या विविध भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. शहरातील काही वस्त्यात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. नळांना पाणी कमी दाबाने येत आहे. मे महिन्यात पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासन व सत्तापक्षाने संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. परंतु अद्याप त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. टंचाईसोबतच दूषित पाण्याच्या मुद्यावरून विरोधक आक्र मक असल्याने शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.सर्व कामकाज बाजूला सारून स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून पाणीटंचाईच्या मुद्यावर चर्चेची मागणी करण्याच्या प्रयत्नात विरोधक आहेत. सत्तापक्षाच्या अनेक नगरसेवकांच्या प्रभागातही पाणीटंचाईची ओरड आहे. परंतु या मुद्यावरून सत्तापक्षाची कोंडी होण्याची शक्यता विचारात घेता पक्षाच्या नगरसेवकांना गुरुवारी बैठकीत सूचना देण्यात आल्या. त्यामुळे टंचाई असली तरी सत्तापक्षाचे नगरसेवक यावर आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता नाही.दूषित पाणीपुरवठा व पाणीटंचाईच्या मुद्यावरून शहरातील विविध भागात आंदोलन करण्यात आले. सभागृहातही या मुद्यावरून सत्तापक्षाला कोंडीत पकडण्याची विरोधकांना संधी आहे. परंतु काँग्रेस दोन गटात विभागली आहे. त्यामुळे टंचाईसोबतच निधी वाटपातील भेदभाव व अन्य महत्त्वाच्या मुद्यावर काँग्रेस संघटित नाही. मध्य नागपुरातील अनेक वस्त्यात पाण्याची टंचाई आहे. नागरिकांनी आंदोलन केले परंतु काँग्रेस संघटित नसल्याने आक्रमणाची धार कमी झाली आहे. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित केला असून यावर ते आक्रमक आहेत.दूषित व कमी दबाने पाणीपुरवठाकन्हान नदीच्या पात्रातील पातळी कमी झाली आहे. यासोबतच शहरातील नळांना पाणी कमी दाबाने येत आहे. मे महिन्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. २४ बाय ७ योजनेच्या माध्यमातून शहरातील किती भागातील नागरिकांना २४ तास पाणी मिळते, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. मागील महिन्याच्या सर्वसाधारण सभेतही पाण्याचा मुद्दा गाजला होता. शुक्रवारी पुन्हा हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.एम्प्रेस मॉलच्या मुद्यावर दटके आक्रमकगांधीसागर तलावाच्या बाजूला उभारण्यात येत असलेल्या एम्प्रेस सिटीच्या बांधकामाचा वाद कोर्टात सुरू आहे. या प्रकरणात महापालिकेची कोंडी झाली आहे. असे असतानाच माजी महापौर प्रवीण दटके यांनी एम्प्रेस सिटीच्या बांधकामाबाबतचा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे एम्प्र्रेस सिटीतील विहिरीत तीन मजुरांचा मृत्यू झाला. याविरोधात नागरिकांनी आंदोलन के ले. या प्रकरणात प्रवीण दटके व रमेश पुणेकर यांच्यासह ७० लोकांवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. त्यामुळे दटके व पुणेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

टॅग्स :WaterपाणीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका