शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

इसिस हस्तकाची पत्नी जेरबंद :एनआयएचा वर्धेत छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 01:06 IST

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी भल्या सकाळी वर्धा(सेवाग्राम)नजीकच्या म्हसाळा परिसरात छापा मारून एका महिलेला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली असून, कारवाईची कुणकुण लागताच गुप्तचर यंत्रणा आणि एटीएसचे पथकही वर्धेत पोहोचले. ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव नहनुमा बाशिद असे असून, ती हैदराबाद येथील रहिवासी होय. म्हसाळा येथे तिचे माहेर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तपास यंत्रणांनी नहनुमाच्या आईलाही विचारपूस करण्यासाठी ताब्यात ठेवले होते.

ठळक मुद्दे तीन वर्षांपासून होती वाँटेड

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी भल्या सकाळी वर्धा(सेवाग्राम)नजीकच्या म्हसाळा परिसरात छापा मारून एका महिलेला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली असून, कारवाईची कुणकुण लागताच गुप्तचर यंत्रणा आणि एटीएसचे पथकही वर्धेत पोहोचले. ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव नहनुमा बाशिद असे असून, ती हैदराबाद येथील रहिवासी होय. म्हसाळा येथे तिचे माहेर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तपास यंत्रणांनी नहनुमाच्या आईलाही विचारपूस करण्यासाठी ताब्यात ठेवले होते.नहनुमा ही अब्दुल बाशिद नामक इसिसच्या हस्तकाची पत्नी असून, त्याला २०१६ मध्ये एनआयएने हैदराबाला जेरबंद केले होते. सध्या तो दिल्लीच्या तिहाड कारागृहात बंदिस्त आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, बाशिद हा सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईला इसिससोबत जोडण्याचा प्रयत्न करीत होता. त्याने त्यासाठी वेगवेगळे आॅनलाईन ग्रुप तयार केले होते. त्याची कुरापत ध्यानात येताच तपास यंत्रणांनी २०१६ मध्ये बाशिदच्या मुसक्या बांधल्या होत्या. ‘अबूधाबी केस’नावाने हे प्रकरण तीन वर्षांपूर्वी गाजले होते. प्रदीर्घ चौकशीनंतर त्याचे इसिस कनेक्शन उघड होताच त्याला कारागृहात डांबण्यात आले. तेव्हापासून तो दिल्लीच्या तिहाड कारागृहात बंदिस्त आहे. दरम्यान, बाशिदची पत्नी नहनुमा तेव्हापासून अचानक भूमिगत झाल्यासारखी झाली होती. ते लक्षात आल्यापासून तिच्यासह अन्य काही जणांचा एनआयएसह विविध तपास यंत्रणा शोध घेत होत्या. गुरुवारी नहनुमा हैदराबादहून नागपूरकडे निघाल्याचे कळताच तपास यंत्रणा सतर्क झाली. ती शुक्रवारी वर्धा येथे उतरली आणि म्हसाळ्यात माहेरी पोहोचली. तिच्या मागावर असलेल्या एनआयएच्या पथकाने शनिवारी भल्या पहाटे छापा मारून नहनुमाला ताब्यात घेतले. तिच्या आईच्या घराची झडती घेतल्यानंतर एनआयएच्या पथकाने नहनुमाजवळच्या साहित्यासह तिला ताब्यात घेतले. तिच्या आईलाही विचारपूस करण्यासाठी (किंवा नहनुमाने उलटसुलट आरोप करू नये म्हणून) तपास पथकाने सोबत नेले. प्रारंभी गुप्त ठिकाणी नेऊन नहनुमाची प्रदीर्घ चौकशी केली. त्यानंतर या प्रकाराची सेवाग्राम पोलीस ठाण्यात नोंद करून तेथेही तिची चौकशी करण्यात आली. तपास यंत्रणेने ही कारवाई फारच गोपनीय पद्धतीने केली. नहनुमाची प्रारंभिक चौकशी संपेपर्यंत वर्धा पोलिसांनाही याबाबत फारशी माहिती देण्यात आली नाही.दरम्यान, या कारवाईची कुणकुण लागताच गुप्तचर विभाग (आयबी) तसेच नागपूरच्या दहशतवाद विरोधी पथकातील (एटीएस) अधिकारी-कर्मचारी वर्धेला पोहोचले. वृत्त लिहिस्तोवर नहनुमासोबत तिच्या निकटवर्तीयांचीही तपास पथकाचे अधिकारी चौकशी करीत होते. नहनुमा कधीपासून आणि कशा पद्धतीने इसिसच्या संपर्कात आली. गेली ती तीन वर्षे कुठेकुठे होती, कुणाच्या संपर्कात होती, काय करीत होती, त्याची चौकशी केली जात आहे.पाकिस्तानच्या संपर्कात?सूत्रांच्या माहितीनुसार, नहनुमा-बाशिदचे पाकिस्तानमध्ये नातेवाईक आहेत. बाशिदच्या अटकेपूर्वी तो निरंतर पाकिस्तानमध्ये संपर्कात होता तर, त्याच्या अटकेनंतर नहनुमादेखील पाकिस्तानमधील काही जणांच्या संपर्कात होती, असे समजते. हा संपर्क सहज होता की यामागे काही विशिष्ट माहितीची आदानप्रदान केली जात होती, त्याचीही तपास यंत्रणा चौकशी करीत आहे.पुन्हा एकदा वर्धा चर्चेतदहा वर्षांपूर्वी इंडियन मुजाहिदीनच्या माध्यमातून सिमीने वर्धा  जिल्ह्यात  मोठा स्लीपर सेल तयार केला होता. त्यामुळे एटीएसने अनेकदा वर्धेत छापेमारीही केली होती, नंतर तेथील तरुणांचे कौन्सिलिंग करून त्यांना त्यातून बाहेर काढले होते. तेव्हापासून दहशतवादाशी संबंधित कोणत्याही घडामोडीत वर्धेचे नाव जुळले नव्हते. आज थेट एनआयएनेच छापा मारल्याने सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वर्धासोबतच हैदराबादमध्येही तीन ठिकाणी एनआयएने छापेमारी करून काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाISISइसिसraidधाड