शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय मीडियाचं ध्रुवीकरण झालंय? ANIच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 23:29 IST

Smita Prakash : माध्यमांबाबत सोशल माध्यमांवर नकारात्मक प्रचार-प्रसार होतो. मात्र माध्यमांचे कुठल्याही प्रकारचे ध्रुवीकरण झालेले नाही. माध्यमे कालसुसंगत पद्धतीनेच कार्य करत आहेत, असे प्रतिपादन स्मिता प्रकाश यांनी केले.

भारतीय मीडियाचं ध्रुविकरण झालं आहे का? य मुद्यावर बोलताना लोकमत मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश म्हणाल्या की, ध्रुवीकरण चांगली बाब आहे. कारण आज सगळ्यांकडे मोबाईल आहेत. सोशल मीडिया आहे. कुणालाही कुठल्याही बाबतीत सांगण्यासाठी आमची गरज नाही. 

यावेळी मीडिया आपल्या बातम्या कव्हर करत नाही, या राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपालाही त्यांनी उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की, राहुल गांधी म्हणतात की, मीडिया पक्षपाती झालाय, तो माझ्या बातम्या कव्हर करत नाही. मात्र भारत जोडो यात्रेतील एक एक दिवस भारतीय मीडियाने कव्हर केला आहे. राहुल गांधी जेव्हा प्रेस कॉन्फ्ररन्स करतात तेव्हा सर्व वृत्तवाहिन्या ती कव्हर करतात. हा मोदी समर्थक आहे. हा राहुल समर्थक आहे. हा पवार समर्थक आहे, हा ममता समर्थक आहे, असा आरोप करणं सोपं आहे. मात्र आता शिव्या खाऊन खाऊन आमची चामडी घट्ट झाली आहे, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. 

यावेळी परदेशी प्रसारमाध्यमांचा उल्लेख करत स्मिता प्रकाश यांनी सांगितलं की, भारतीय मीडिया आपलं काम करत नाही आहे, अशी वातावरणनिर्मिती परदेशी मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आम्ही बातम्या कव्हर करत नाही, तर सरकारच्या विचारांचं पालनपोषण करत आहोत, असा आरोप होतो. तीन दिवसांपूर्वी टाइम मॅगझिनमध्ये एक बातमी प्रसारित झाली होती. तिचा मुख्य  मुद्दा हा अमृतपाल याला अटक करण्याच्या मोहिमेत झालेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा होता. त्याचं कारण म्हणजे यावेळी इंटरनेट आणि मेसेजिंगवर निर्बंध आणले गेले होते. मात्र या मंडळींना पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीनसारख्या देशात होणाऱ्या अशाच प्रकारांची चिंता नसते, असा टोला त्यांनी लगावला.

माध्यमांबाबत सोशल माध्यमांवर नकारात्मक प्रचार-प्रसार होतो. मात्र माध्यमांचे कुठल्याही प्रकारचे ध्रुवीकरण झालेले नाही. माध्यमे कालसुसंगत पद्धतीनेच कार्य करत आहेत, असे प्रतिपादन स्मिता प्रकाश यांनी केले.

टॅग्स :Mediaमाध्यमेLokmatलोकमत