शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात पाणीटंचाईची ३२ कोटींची कामे; मिळाले फक्त ७.३० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 11:12 IST

जिल्ह्यात यावर्षी पाणीटंचाईची ३२ कोटी रुपयांची कामे झाली. त्यासाठी निधीचा प्रस्ताव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने शासनाकडे पाठविला. परंतु शासनाने टंचाईच्या कामाचे फक्त ७.३० कोटी रुपये पाठविले.

ठळक मुद्देदेयके वाटायची कशी ? विभागासमोर प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात यावर्षी पाणीटंचाईची ३२ कोटी रुपयांची कामे झाली. त्यासाठी निधीचा प्रस्ताव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने शासनाकडे पाठविला. परंतु शासनाने टंचाईच्या कामाचे फक्त ७.३० कोटी रुपये पाठविले. कामाच्या पेमेंटसाठी सध्या कंत्राटदारांची विभागात गर्दी होत आहे. अपेक्षित निधी मिळाला नसल्याने कंत्राटदारांची देयके वाटायची कशी? असा सवाल विभागाला पडला आहे.२०१८-१९ चा पाणीटंचाईचा उपाययोजना कार्यक्रम संपल्यानंतर देयके काढण्यासाठी कंत्राटदारांच्या जिल्हा परिषदेत चकरा वाढल्या आहे. जिल्ह्यात यंदा टंचाईची ४३० कामे झाली. त्याची देयके ३२ कोटींची आहे. शासनाकडून अपेक्षित निधी आला नसल्यामुळे कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर यांना जाब विचारण्यात येत आहे़ कामाची देयके ही एकमुस्त निघत नसल्याने यापुढे कामे करायची की नाही, असा सवालही कंत्राटदार विभागप्रमुखांना विचारत आहे. ही स्थिती अशीच राहिल्यास पुढील काळात पाणीटंचाई उपाययोजनेची कामे प्रभावित होण्याची शक्यता आहे़ २०१८-१९ या वर्षात झालेल्या टंचाईच्या कामांमध्ये विहीर खोलीकरण, खासगी टँकर, विहीर अधिग्रहण, तात्पुरत्या नळ योजना, प्रगतिपथावरील नळ योजना पूर्ण करणे, नळ योजनांची दुरुस्ती आदी कामांचा समावेश होता़ कंत्राटदारांनी सर्व अंदाजपत्रक स्थानिक पंचायत समितीत सादर केल्यानंतर, निधी मागणीचा प्रस्ताव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पाठविण्यात आला़ मात्र, ३२ कोटींच्या मागणीनंतर ७ कोटी ३० लाखांचा निधी आला आहे़ त्यापैकी दोन कोटींची रक्कम वाटण्यात आल्याची माहिती आहे़ या कंत्राटदारांची अर्धेअधिक देयके द्यायची झाल्यास १७ कोटी ३९ लााख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे़ आता कधी निधी येईल, याची कुठलीही शाश्वती नाही़ त्यामुळे कंत्राटदारांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे़

टॅग्स :Waterपाणी