शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाल्याच्या पाण्याने उद्यानांचे सिचंन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST

नागपूर : शहरातून वाहणाऱ्या नाल्यांचे पाणी व्यर्थ वाहण्यापेक्षा त्याद्वारे उद्यानाचे सिंचन करण्यासह इतर कामात उपयाेगात आणण्याची याेजना महापालिकेने तयार ...

नागपूर : शहरातून वाहणाऱ्या नाल्यांचे पाणी व्यर्थ वाहण्यापेक्षा त्याद्वारे उद्यानाचे सिंचन करण्यासह इतर कामात उपयाेगात आणण्याची याेजना महापालिकेने तयार केली आहे. उद्यानाजवळून जाणाऱ्या नाल्यांवर लहान सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट तयार करण्यात येतील. पहिल्या टप्प्यात १२ उद्यानांजवळ हा उपक्रम राबविण्यात येईल. मनपाच्या स्थायी समितीच्या येत्या बैठकीत प्रशासकीय मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार १२ एसटीपीच्या निर्मितीवर १.१२ काेटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. शिवाय दरवर्षी एसटीपीच्या संचालनावर ९० लाख रुपये खर्च हाेतील. सार्वजनिक आराेग्य अभियांत्रिकी विभागातर्फे हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार एसटीपीच्या पाण्याचा उपयाेग उद्यानात करण्यासह शहरातील प्रसाधनगृह, बांधकाम विभागाद्वारे सुरू रस्त्याच्या कामांसह विविध उपक्रमात नाॅन पाेर्टेबल वाॅटर म्हणून उपयाेगात आणले जाणार आहे. यामुळे भूजलाचा उपयाेग कमी हाेईल आणि व्यर्थ वाया जाणाऱ्या ०.१०५ मिलियन लिटर पाण्याचा उपयाेग हाेईल. यामुळे महापालिकेला वर्षाला २.६० लाख रुपयाची कमाई हाेणे अपेक्षित आहे.

उल्लेखनीय म्हणजे नाल्याचे पाणी उपयाेगात आणण्याची याेजना अनेक वर्षापूर्वी तयार करण्यात येत हाेती. मात्र यामध्ये खर्च अधिक आणि कमाई नगण्य आहे. त्यामुळेच एसटीपी याेजनेचे क्रियान्वयन झाले नाही. जे तयार आहेत तेही देखरेखीअभावी खराब हाेत आहेत. दुसरीकडे मनपाची आर्थिक स्थिती दयनीय आहे. त्यामुळे प्रस्तावावर अंमलबजावणी हाेणार की नाही हा प्रश्नच आहे.

ट्रॅफिक सिग्नल नादुरुस्त, तरीही वाढीव कामाला मंजुरी

शहराच्या चाैकातील ट्रॅफिक सिग्नलच्या देखभाल दुरुस्तीचे काम डेकोफर्न कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले आहे. १५ जुलै २०२० ला दिलेल्या कार्यादेशाची मुदत संपली आहे. असे असताना सत्तापक्षाशी जवळीक असल्याने डेकोफर्न कंपनीला प्रस्तावित दरापेक्षा १५.३ टक्के दराने ६ महिन्याची मुदत वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २४ लाख ९ हजार ४४० रुपयाचे काम देण्याची तयारी करण्यात आली आहे.