शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सुराबर्डी तलावाच्या जमिनीत घोटाळा केल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 17:07 IST

Nagpur : कर्तव्य बजावण्यात अप्रामाणिकपणा दिसल्यामुळे हायकोर्टाने केली कानउघाडणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यावसायिक अंकुर अग्रवाल यांच्यासोबत हातमिळवणी करून सुराबर्डी तलावाच्या जमिनीची भरभरून मलाई खाल्ली, असा संशय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला बुधवारी मूळ अभिलेखाची पाहणी केल्यानंतर आला. त्यामुळे न्यायालयाने पाटबंधारे अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून कार्यकारी संचालकांना यावर ११ डिसेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला.

तब्बल ७५.३९ हेक्टर परिसरात पसरलेल्या आणि आजूबाजूच्या गावातील नागरिकांची पाण्याची गरज भागवित असलेल्या सुराबर्डी तलावाच्या संवर्धनासाठी शेतकरी नितीन शेंद्रे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गेल्या तारखेला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रांजली टोंगसे यांच्या प्रतिज्ञापत्राचे अवलोकन केल्यानंतर न्यायालयाला विविध मुद्दे खटकले होते. पाटबंधारे विभागाने पर्यटन विकासाकरिता सुराबर्डी तलावाची काही जमीन अंकुर अग्रवाल यांना २००५ मध्ये दहा वर्षांच्या लीजवर दिली होती. ती लीज मार्च २०१५ मध्ये संपली. परंतु, महामंडळाने ती जमीन अद्याप स्वतःच्या ताब्यात घेतली नाही. त्यामुळे न्यायालयाने कार्यकारी संचालकांना यासंदर्भात प्रतिज्ञापत्र मागितले होते. 

तसेच, पाटबंधारे अधिकारी खरी माहिती लपवून ठेवत असल्याचे दिसून आल्याने जमिनीच्या लीजचा मूळ अभिलेखही सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, कार्यकारी संचालकांनी बुधवारी प्रतिज्ञापत्र सादर केले, पण त्यातील माहितीने न्यायालयाचे समाधान झाले नाही. हे प्रतिज्ञापत्र कार्यकारी संचालकांची बेजबाबदार वृत्ती दर्शविते, असे न्यायालयाने खडसावले. त्यानंतर लीज कराराचा मूळ अभिलेख तपासल्यानंतर अग्रवाल या सार्वजनिक जमिनीचा सुरुवातीपासूनच खासगी उपयोग करीत असल्याचे आणि त्यांनी या ठिकाणी पर्यटन विकासाकरिता कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याचे आढळून आले. करिता, न्यायालयाने अत्यंत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. सुधीर मालोदे, तर पाटबंधारे विभागातर्फे अॅड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.

हायकोर्टाने असे ताशेरेही ओढले

  • सुराबडी तलावाच्या जमिनीवर नागरिकांकरिता पर्यटनाच्या सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. परंतु, या जमिनींचा विशेष व्यक्तीकरिता दुरुपयोग करण्यात आला. या जमिनीचे व्यावसायिक शोषण केले जात आहे. 
  • ही जमीन दीर्घकाळापासून खासगी व्यक्तीच्या ताब्यात आहे. त्या व्यक्तीचा या जमिनीवर कोणताही अधिकार नाही. 
  • ही जमीन कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याची खासगी मालमत्ता नाही. ही सार्वजनिक जमीन आहे. परंतु, अधिकारी तिचा खासगी मालमत्तेसारखा उपयोग करीत आहेत.
  • हा तलाव अतिक्रमणमुक्त ठेवण्याची व त्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी पाटबंधारे महामंडळाची आहे. परंतु, महामंडळ याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते.
टॅग्स :nagpurनागपूर