शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांचा बेजबाबदारपणा: अखेर कळमना भाजीबाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 20:30 IST

कॉटन मार्केट आणि कळमना या शहरातील भाज्यांच्या मुख्य बाजारपेठा बंद करण्याच्या मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. याकरिता नागरिकांचा बेजाबदारपणा कारणीभूत ठरला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक फटक : ग्राहकांनाही पाळावेत सोशल डिस्टन्सिंगचे नियम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कॉटन मार्केट आणि कळमना या शहरातील भाज्यांच्या मुख्य बाजारपेठा बंद करण्याच्या मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. याकरिता नागरिकांचा बेजाबदारपणा कारणीभूत ठरला आहे.उत्पादक शेतकरी, व्यापारी, अडतिया, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक ही साखळीच तुटल्याने शेतकऱ्यांना शहरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या किरकोळ बाजारात कवडीमोल भावात भाज्या विकून गावाकडे परत जावे लागेल. ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात भाज्यांची खरेदी करताना गर्दी केल्याने मनपा आयुक्तांना अखेर कठोर निर्णय घ्यावा लागला. बाजारपेठा बंद झाल्याने ग्राहकांना खरेदीसाठी पायपीट करावी लागणार आहे. दारात नियमितपणे सहजरीत्या उपलब्ध होणारा भाजीपाला ग्राहकांना मिळणार नाही. मनपा आयुक्तांच्या निर्णयानंतर कॉटन मार्केट, कळमन्यासह रेशीमबाग मैदान, राजाबाक्षा मैदान, गाडीखाना मैदान, बुधवार बाजार (सोमवारी पेठ) बंद झाले आहेत.कळमना युवा सब्जी अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर गौर म्हणाले, कळमना भाजीबाजारात ग्राहकांची गर्दी वाढत असल्याच्या तक्रारीनंतर मनपा आयुक्तांनी बाजार अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय रविवारी घेतला. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी दुपारी ४.३० वाजता कळमना बाजारात अडतियांची बैठक घेतली आणि तात्काळ सोमवारपासून बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला. पण व्यापारी आणि अडतियांनी बाजू मांडताना रात्री आणि पहाटेपर्यंत शेतकरी भाज्या विक्रीसाठी आणतात. या निर्णयाची माहिती नसल्याने त्यांनी भाज्या कुठे विकाव्यात, हे संकट त्यांच्यापुढे उभे राहणार आहे. त्यामुळे सोमवारी बाजार सुरू ठेवावा, असे त्यांना पटवून देण्यात आले. त्यानंतर मुंढे यांनी सोमवारी बाजार सुरू ठेवून नंतर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आयुक्तांच्या पुढील आदेशापर्यंत कळमना भाजीबाजार बंद राहणार असल्याचे गौर यांनी सांगितले.बाजारात गर्दी होत असल्याच्या कारणावरून १२ दिवसांपूर्वी ५० अडतिये व व्यापारी आणि १०० गाड्यांना बाजारात सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्याचे पालन करण्यात येत होते. ग्राहकांना किरकोळ विक्रेत्यांच्या माध्यमातून दारातच भाज्या मिळत असतानाही बेजबाबदारपणे त्यांनी मुख्य बाजारात गर्दी केल्याचा फटका अखेर शेतकऱ्यांना बसला आहे. नागरिकांमुळेच शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. ग्राहकांनी आवश्यक तेवढ्याच भाज्यांची खरेदी करावी, असे गौर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याvegetableभाज्याMarketबाजारnagpurनागपूर